यंदा पावसाळ्यावर एल-निनोचा तीव्र प्रभाव असल्यामुळे पावसाने अर्ध्यातच दांडी मारली. मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होताच महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल जाणवू लागला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबर रोजी कोकण किनारपट्टीसह राज्यातील बहुतांश भागांत तीव्र उकाडा आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागांत तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
मान्सून माघारी फिरत असताना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान वाढण्याची शक्यता आहे.