शिवरायांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्याला मोठा वणवा

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा शिवरायांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या सातारा येथील अजिंक्यतारा या किल्ल्याला भीषण आग लागली आहे. आगीच्या या वणव्याने किल्ल्या जवळील झाडांनी पेट घेतला. या वणव्यात किल्ल्याच्या वनसंपदेची मोठी हानी झाली आहे. अज्ञात इसमांनी ही आग लावल्याची माहिती मिळत आहे.  या आगीची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेत शर्थीच्या प्रयत्नाने ही आग विझवली. मात्र, […]

शिवरायांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्याला मोठा वणवा

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

शिवरायांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या सातारा येथील अजिंक्यतारा या किल्ल्याला भीषण आग लागली आहे. आगीच्या या वणव्याने किल्ल्या जवळील झाडांनी पेट घेतला.

या वणव्यात किल्ल्याच्या वनसंपदेची मोठी हानी झाली आहे. अज्ञात इसमांनी ही आग लावल्याची माहिती मिळत आहे. 

या आगीची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेत शर्थीच्या प्रयत्नाने ही आग विझवली. मात्र, या आगीच्या घटनेबाबात शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number