प्रेयसीसाठी पती बनला हैवान! भरधाव कारच्या बोनेटवरून…; रस्त्यावर नागरिकांच्या किंचाळ्या; VIDEO

Viral Video : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहिल्यानंतर पत्नीने जाब विचारला. वाद वाढल्यानंतर पतीने कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटी नेमकं काय घडलं जाणून घ्या.
पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं
Wife Spots Husband With Another Woman

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये चित्रपटाला शोभेल असा थरार रस्त्यावर पाहायला मिळाला आहे. पतीला दुसऱ्या महिलेसोबत कारमध्ये पाहिल्यावर संतापलेल्या पत्नीने थेट धावत्या गाडीच्या बोनेटवर लटकून त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. सध्या संपूर्ण थराराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नवऱ्याला दुसऱ्या बाईसोबत पाहिलं अन्
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता सिंह या आपल्या पती मयंक सिंह याला त्याच्या प्रेयसीसोबत कारमध्ये बसलेले पाहिले.हे दृश्य पाहताच महिला पूर्णपणे हादरुन गेली आणि तिने दोघांना जाब विचारला. सुरुवातील त्यांच्यात शाब्दिक वाद झाला.

हेही वाचा-अपघाताची वाट पाहणारा प्रवास! काही वाहनाच्या टपावर तर काही…; थरकाप उडवणारा VIDEO

मात्र, काही वेळातच वाद विकोपाला गेला. वादानंतर मयंकने तिथून पळ काढण्यासाठी कार सुरु केली. आपला पती पळून जाऊ नये म्हणून सुनीता या थेट कारसमोरच आडव्या आल्या. मात्र, मयंकने कार न थांबवता पुढे नेली. त्यानंतर आपला बचाव करण्यासाठी आणि पळून जाणाऱ्या पतीला थांबवण्यासाठी सुनीता यांनी कारच्या बोनेटला घट्ट पकडून ठेवले.

धावत्या कारच्या बोनेटला लटकलेल्या महिलेला पाहून रस्त्यावरील लोकही काही वेळासाठी अवाक झाले. या संपूर्ण घटनेची माहिती समजताच लोहियानगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मयंक सिंहसह त्याच्या प्रेयसीला अटक केली तसेच घटनेत वापरण्यात आलेली कारही जप्त केली आहे.

नेमकं असं का केल?
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहिल्यावर पत्नीने जाब विचारला असता त्याने थेट कारने तिला धडक देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात येत आहे. हा प्रकार फक्त कौटुंबिक वादाचा नसून जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न असल्याने पोलिसांनी तातडीने गंभीर दखल घेतली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. मात्र, व्हिडिओ व्हायरल होत असल्याने या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version