बोईस हॉस्टेलमध्ये गर्लफ्रेंडला आणण्याचा गजब कारनामा;सुटकेस उघडताच…

विद्यापीठाच्या वसतिगृह गेटवर सुरक्षा रक्षकांच्या लक्षात सुटकेसच्या हालचालीत काहीतरी गडबड असल्याचं आलं. त्यातच आतून अचानक मुलीचा आवाज आल्याने सुरक्षारक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप

बोईस हॉस्टेलमध्ये गर्लफ्रेंडला आणण्याचा गजब कारनामा;सुटकेस उघडताच…

हरियाणा: प्रेमात माणूस कुठल्या टोकाला जाईल याचा काही नेम नाही, याचं ताजं उदाहरण हरियाणातील सोनीपतच्या जिंदाल विद्यापीठात पाहायला मिळालं. एका विद्यार्थ्याने आपल्या गर्लफ्रेंडला थेट सुटकेसमध्ये लपवून बॉईज हॉस्टेलमध्ये नेण्याचा अजब प्रकार केला. मात्र, हा प्रेमाचा कट शिताफीने फोडण्यात आला. सुटकेस उचलताना अचानक झालेल्या धक्याने गर्लफ्रेंडच्या तोंडून निघालेल्या आवाजामुळे हा सगळा प्रकार उघड झाला आणि बघता बघता प्रकरण व्हायरलही झालं.

विद्यापीठाच्या वसतिगृह गेटवर सुरक्षा रक्षकांच्या लक्षात सुटकेसच्या हालचालीत काहीतरी गडबड असल्याचं आलं. त्यातच आतून अचानक मुलीचा आवाज आल्याने सुरक्षारक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करत सुटकेस उघडण्यास भाग पाडलं. आत काय आहे हे पाहून सर्वांनाच धक्का बसला एक मुलगी आत लपून बसलेली होती. याचा संपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

या धक्कादायक आणि तितक्याच हास्यास्पद प्रकारावर नेटिझन्सनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या घटनेला “मिशन इम्पॉसिबल: हॉस्टेल वर्जन” असं नाव दिलं आहे, तर काहींनी तरुणाचं धाडस पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. मात्र, अनेकांनी विद्यापीठाच्या सुरक्षेवर आणि विद्यार्थ्यांच्या शिस्तीवर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं आहे.

सध्या विद्यापीठ प्रशासनाने याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकाराची चौकशी सुरु असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. 

 

http://

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number