Baba Vanga Prediction: सध्या जगभरातील गुंतवणूकदारांना शेअर बाजारात नुकसान सहन करावं लागत आहे. अशातचं आता बाबा वांगा यांच्या भाकितांवरील चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. बाबा वांगा यांनी 2025 मध्ये मोठ्या आर्थिक आपत्तीचा इशारा दिला होता आणि सध्याच्या घडामोडी पाहता त्यांचे भाकित खरी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाचा जागतिक पातळीवर परिणाम -
दरम्यान, 5 एप्रिल रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात कर लादण्याची घोषणा करून जागतिक व्यापारात एक मोठे पाऊल उचलले. त्यांनी या दिवसाला मुक्ती दिन असे नाव दिले आणि चीनवर 34 टक्के, युरोपियन युनियनवर 20 टक्के आणि मेक्सिको आणि कॅनडातील अनेक उत्पादनांवर 25 टक्के शुल्क लादले. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर शेअर बाजारात गोंधळ उडाला. प्रमुख जागतिक शेअर बाजार निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली आणि गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत होऊ लागला. जर हे व्यापार युद्ध आणखी वाढले तर जागतिक मंदी निश्चितच येऊ शकते, असे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा - Baba Vanga Predicts: सटीक भविष्यवाणी करणारे बाबा वेंगा नेमकं आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती!
चीन आणि अमेरिकेत व्यापार युद्ध -
तथापि, डोनाल्ड ट्रम्पच्या शुल्काला उत्तर देताना चीननेही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. बीजिंगने अमेरिकन वस्तूंवर 34 टक्के कर लादण्याची घोषणा केली. यामुळे संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी इशारा दिला की, जर चीनने माघार घेतली नाही तर अमेरिका अतिरिक्त 50 टक्के कर लादेल. चीनने माघार घेण्यास नकार दिला आणि त्यानंतर अमेरिकेने एकूण शुल्क 104 टक्क्यांपर्यंत वाढवले. तथापी, प्रत्युत्तरादाखल, चीनने गुरुवारपासून सर्व अमेरिकन उत्पादनांवर 84 टक्के कर लादण्याची घोषणा केली.
हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांचं एक पाऊल मागे, टॅरिफच्या यादीतून 'या' वस्तू वगळल्या
चीनवर 125% कर -
डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांसोबत व्यापार करारांवर वाटाघाटी करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी दिला. परंतु त्यांनी चीनविरुद्धचा कर 125 टक्क्यांपर्यंत वाढवून आणखी वाढवला, जो तात्काळ लागू झाला, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारी समुदायातील चिंता आणखी वाढल्या.
बाबा वांगाची भाकिते -
दरम्यान, बाबा वांगाच्या भाकितांबाबत अधिकृत नोंद नसली तरी, त्यांच्या भाकितामध्ये 9/11 चा हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू आणि सीरियन संकट यासारख्या घटनांचा समावेश असल्याचे म्हटले जाते. 2025 मध्ये त्यांनी युरोपमध्ये युद्ध, विनाशकारी भूकंप आणि जागतिक आर्थिक संकटाची भविष्यवाणी केली होती. यापैकी दोन घटना आधीच घडल्या आहेत. तथापी, 28 मार्च रोजी म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेच्या भूकंपात 2700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तसेच आता जागतिक व्यापार युद्धामुळे आर्थिक संकट अधिक गडद होताना दिसत आहे. त्यामुळे बाबा वांगा यांची भविष्य खरी ठरते की, काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.