Monday, June 23, 2025 12:29:29 PM

माकडाचा विचित्र कारनामा! व्यावसायिकाकडून हिसकावली 20 लाख रुपयांच्या हिऱ्यांच्या दागिन्यांनी भरलेली बॅग

वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात आलेल्या एका व्यापारी कुटुंबातील महिलेच्या हातातून एका माकडाने हिरे आणि दागिन्यांनी भरलेली बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर माकडाने मंदिरातून पळ काढला.

माकडाचा विचित्र कारनामा व्यावसायिकाकडून हिसकावली 20 लाख रुपयांच्या हिऱ्यांच्या दागिन्यांनी भरलेली बॅग
Monkey snatched Bag
Edited Image

Purse Snatched By Monkey: मथुरेच्या वृंदावनमध्ये  धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे माकडांच्या खोडसाळ कृत्यांनी सर्वांनाच धक्का बसला आहे. वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात आलेल्या एका व्यापारी कुटुंबातील महिलेच्या हातातून एका माकडाने हिरे आणि दागिन्यांनी भरलेली बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर माकडाने मंदिरातून पळ काढला. या पर्समध्ये सुमारे 20 लाख रुपयांचे हिरे असल्याचे सांगण्यात येत आहे. 

या घटनेमुळे पीडितेच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. तसेच उत्तर प्रदेश पोलिसांसाठी ही घटना डोकेदुखी ठरली. त्यानंतर अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांना ही बॅग सापडली. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की माकडांची दहशत आता सामान्य लोकांसाठी गंभीर धोका बनत आहे. या घटनेनंतर भाविकांनी मंदिर प्रशासनाकडे सुरक्षा व्यवस्था आणि माकडांशी सामना करण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल चिंता व्यक्त केली.

हेही वाचा - पाकिस्तानातील कराची तुरुंगातून 200 हून अधिक कैदी फरार; काय आहे नेमकं प्रकरण?

काय आहे नेमकं प्रकरण? 

खरंतर, शुक्रवारी, मंदिराच्या बाहेर कुटुंबासह वृंदावनला भेट देण्यासाठी आलेल्या अभिषेक अग्रवाल या भाविकाच्या हातातून एका माकडाने अचानक बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर माकडं घटनास्थळावरून पळून गेले. या पिशवीत सुमारे 20 लाख रुपये किमतीचे हिऱ्यांचे दागिने ठेवले होते. त्यानंतर व्यापाऱ्याने माकडाचा पाठलाग केला आणि त्याला फळांचे आमिष दाखवले, पण या खोडकर माकडाने ऐकले नाही. त्यानंतर अभिषेकने पोलिसांना याबद्दल माहिती दिली.

हेही वाचा - OMG! 20 वर्षांपासून पोहून पार करतात शाळेपर्यंतचे अंतर! कोण आहेत व्हायरल 'ट्यूब मास्टर'?

दरम्यान, पोलिसांनी माकडाचा शोध घेत हिऱ्यांच्या दागिण्यांची बॅग अभिषेकला सोपवली. या घटनेनंतर मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले. काही लोकांनी सांगितले की मंदिर परिसरात माकडांचा त्रास सतत वाढत आहे आणि अनेक वेळा ते मोबाईल फोन, चष्मा किंवा अन्नपदार्थ हिसकावून घेतात. ही खूप चिंतेची बाब आहे.


सम्बन्धित सामग्री