Viral Video: कोरियन वडिलांनी बाळासाठी गायली अंगाई

लहान बाळांच्या संबंधित अनेक व्हिडीओ आपण समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताना दिसत असतात

Viral Video: कोरियन वडिलांनी बाळासाठी गायली अंगाई

मुंबई : लहान बाळांच्या संबंधित अनेक व्हिडीओ आपण समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताना दिसत असतात आणि त्या गोंडस मुलांना पाहिल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे. 

एका भारतीय वंशाच्या महिलेने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ तिचा कोरियन पती लता मंगेशकर यांचे प्रसिद्ध लोरी, चंदा है तू, मेरा सूरज है तू हे गाणे त्यांच्या गोंडस बाळासाठी गात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समाज माध्यमांमध्य त्याचे भरभरून कौतुक होत आहे. व्हिडिओमध्ये कोरियन वडील त्याच्या बाळासाठी गोड आवाजात चंदा है तू गाण गाताना दिसतो. बाळही लोरीला उत्साहाने प्रतिसाद देतो. व्हिडिओमधील मजकूर ओव्हरलेमध्ये लिहिलेला आहे. जेव्हा एक कोरियन वडील त्याच्या अर्ध-भारतीय बाळासाठी हिंदी गाणी गातो.

हेही वाचा : शुभ मंगल सावधान! अशी गजब लग्नपत्रिका वाचली आहे का?

 

हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज, लाईक्स आणि विविध प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. या व्हिडिओवर ऐगु, सुहान दादाच्या गाण्याचा खूप आनंद घेत आहे अशी कमेंट एका वापरकर्त्याने केली आहे. तर अरे देवा!! एक कोरियन माणूस ही हिंदी लोरी इतक्या उत्तम प्रकारे कशी गाऊ शकतो?, किती गोड क्षण… कोरियन माणसाशी लग्न करू इच्छिणाऱ्या मुलींसाठी प्रेरणा, केली, “अरे देवा… फक्त अवाक,  तुम्ही लोक खूप गोंडस आहात… तुम्ही तिघेही! अशा विविध कमेंटचा वर्षाव व्हिडिओवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number