Most Costly Airport In The World : आज आम्ही तुम्हाला जगातील एका अशा विमानतळाबद्दल सांगणार आहोत, जो सर्वात महागडा विमानतळ मानला जातो. या विमानतळावर केळी आणि फास्ट फूडसारख्या मूलभूत वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
आपल्यापैकी ज्यांनी विमानाने प्रवास केला आहे, त्यांना माहीत आहे की, विमानतळावर उपलब्ध असलेल्या वस्तू नेहमीच्या वस्तूंपेक्षा खूपच महाग असतात. यामुळे कोणाचेही बजेट कोलमडू शकते. तसेच, लोकांसाठी प्रवास करणे अधिक महाग होते. विमानतळावर उपलब्ध असलेल्या अनेक गोष्टी महाग असल्या तरी, त्यातल्या त्यात कमी खर्चिक वाटणाऱ्या चहा, कॉफी किंवा पाण्याच्या बाटल्यांचे दरही गगनाला भिडलेले आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नियमित विमानाने प्रवास करत असाल तर तुम्हाला जगातील सर्वात महागडे विमानतळ कोणते आहे, हे माहीत असले पाहिजे. जिथे केळी खरेदी करणंही प्रत्येकाच्या आवाक्यात नसतं.
हेही वाचा - सैरावैरा पळणारे पर्यटक अन् गोळीबाराचा भीषण आवाज; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक VIDEO
हे आहे जगातील सर्वात महागडे विमानतळ
आपण ज्या महागड्या विमानतळाबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव इस्तंबूल विमानतळ आहे. वृत्तानुसार, या विमानतळाला "जगातील सर्वात महागडे" विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील खाद्यपदार्थांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती पाहून आम्हाला आश्चर्य वाटत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
या वस्तूंची किंमत गगनाला भिडली आहे
इस्तंबूल विमानतळावर केळी आणि फास्ट फूड सारख्या मूलभूत वस्तू डोळ्यांत पाणी आणणाऱ्या किमतीत विकल्या जात आहेत, असे वृत्त समोर आले आहे. हे खरेदी करणे सामान्य माणसाच्या बजेटच्या बाहेर आहे. तरीही प्रवाशांना येथे मूलभूत गोष्टी जास्त किमतीत खरेदी कराव्या लागतात.
इस्तंबूल विमानतळावर एक केळे 565 रुपयांना विकले जात आहे
प्रवासी आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्तंबूल विमानतळावर एका केळ्याची किंमत £5 (सुमारे 565 रुपये) आहे. तर, एका पिंट बिअरची किंमत £15 (1,697 रुपये) असेल तर आश्चर्य वाटून घेऊ नका. एवढेच नाही तर, इटालियन वृत्तपत्र कोरीएर डेला सेरा यांनी याला युरोपमधील अन्न आणि पेयांसाठी सर्वात महागडे विमानतळ म्हटले आहे. ज्यामध्ये एका इटालियन प्रवाशाने सांगितले की त्याने 90 ग्रॅम लजान्यासाठी 21 पौंड (2,376 रुपये) दिले होते. मात्र, इतकी महागाई असून देखील येथील खाद्यपदार्थांची आणि जेवणाची गुणवत्ता या महागड्या किमतींशी जुळत नाही.
विमानतळावर बर्गर किंग आणि मॅकडोनाल्ड देखील महाग आहेत
विमानतळावर क्रोइसॅन्टची (बेक्ड बेकरी आइटम ) किंमत £12.50 (1,410 रुपये) ते £15 (1,698 रुपये) पर्यंत होती, तर इटालियन चिकन सॅलडची किंमत £15(1,698 रुपये) होती. शिवाय, बर्गर किंग आणि मॅकडोनाल्ड सारखी बजेट रेस्टॉरंट्सही प्रवाशांकडून जास्त दर आकारत आहेत.
हेही वाचा - पाकिस्तानची कुंडली काय सांगते? ज्याचं कर्म फुटकं, त्याचं नशीबही फुटकंच! शाहबाज-मुनीर.. पाय खोलातच..
इस्तंबूल विमानतळावरून दररोज 2 लाख 20 हजार प्रवासी प्रवास करतात
इस्तंबूल विमानतळावरून दररोज 2 लाख 20 हजार हून अधिक प्रवासी प्रवास करतात. युरोप आणि आशियाच्या मध्ये स्थित, तुर्कीची राजधानी असलेले इस्तंबूल हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. इथे दरवर्षी लाखो लोक भेट देण्यासाठी येतात आणि येथील मुख्य विमानतळ इस्तंबूल येथे आहे. अशा परिस्थितीत या विमानतळाचा वाढता खर्च हा चिंतेचा विषय आहे.