Friday, April 25, 2025 09:31:07 PM

थडथड भांडी पडण्याचा आवाज आला.. पाहते तर काय.. स्वयंपाकघरात होता विषारी साप; मग या महिलेनं काय केलं पाहा..

स्वयंपाकघरात साप शिरला. तो वेगाने इकडे-तिकडे फिरू लागल्यामुळे स्वयंपाकघरातील भांडी पडू लागतात. एक महिला येथे येते. मात्र, ती पळून जात नाही. इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला.

थडथड भांडी पडण्याचा आवाज आला पाहते तर काय स्वयंपाकघरात होता विषारी साप मग या महिलेनं काय केलं पाहा

Snake Viral Video : सापाला बहुतेक सगळेच घाबरतात. याचं मुख्य कारण म्हणजे सापाविषयी फारशी माहिती नसणं. विषारी आणि बिनविषारी साप ओळखता न येणं. वळवळणारा प्राणी पाहिल्यानंतर किळस किंवा भीती वाटणं आदी कारणांनी लोक सापापासून दूर राहतात आणि साप चावल्यामुळे मृत्यू होतो, इतकीच प्राथमिक माहिती असल्यामुळे घाबरतात.

मात्र, काही लोक असे असतात, ज्यांना या सर्व गोष्टींची भीती वाटत नाही आणि काही असे असतात, ज्यांना सापांविषयी आणि साप पकडण्याविषयी पूर्ण माहिती असते. असे लोक क्वचितच पाहायला मिळतात. अशाच एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

हेही वाचा - आधी त्याने मोटारसायकल चोरली; 450 किमी प्रवास केला आणि असे काही केले की, बाईक मालकालाही धक्का बसला!

घरातील स्वयंपाकघरात साप शिरला होता. तो वेगाने इकडे-तिकडे फिरत असल्यामुळे स्वयंपाकघरातील भांडी पडू लागतात. थडथड आवाज येऊ लागतो. यानंतर एक महिला येथे येते आणि सापाला पाहते. अशा प्रसंगी बहुतेक जण आरडाओरडा करत पळू लागतील. मात्र, ती महिला या सापाला घाबरत नाही. उलट, ती त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागते. साप चपळाईने दोन-तीन वेळा तिच्या हातातून निसटतो आणि खाली जमिनीवर पडतो. येथूनही तो इकडे-तिकडे वळवळत पळ काढण्याचा मार्ग शोधू लागतो. अखेर इतके होईपर्यंत ही महिला सापाला शेपटीला पकडून उचलते. यानंतरही साप वेगाने हालचाल करत असतो. व्हिडिओ इथेच संपत असून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

साप पाहिल्यानंतर धाडसी म्हणवणारे लोकही आपला मार्ग बदलतात. लोक सापाला दुरून पाहूनही घाबरतात, त्याला स्पर्श करणे तर दूरच. रस्त्याने जातानाही साप दिसला तर, लोक लगेच आपला मार्ग बदलतात. लोकांनी या व्हिडिओवर अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

स्वयंपाकघरात शिरलेल्या सापाचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. श्रद्धा___8181 नावाच्या इन्स्टाग्राम युजरने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. काही वेळातच तो व्हायरल झाला. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लोकांनी ते लाईक केले आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये, युजर्स महिलेच्या शौर्याचे कौतुक करताना दिसत आहेत. ही महिला घरातील लोकांसोबतच सापाचाही जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “दीदी, तुझी यमराजासोबत उठ-बस आहे का?” दुसऱ्याने लिहिले, "तू खूप धाडसी आहेस, मी ओरडून तिथून पळून गेले असते." तिसऱ्याने लिहिले, “अरे, तो साप सगळीकडे उडत होता... मी त्यावेळी घराबाहेर पळून गेले असते... मुलगी खूप धाडसी आहे!!!” त्याच वेळी, दुसऱ्या एका युजरने लिहिले की, "ही महिला किती धाडसी आहे. माझी एक बहीण आहे जी अगदी सरड्यांनाही घाबरते."

हेही वाचा - श्रद्धेत असीम ताकद असते! आईची प्रार्थना देवाने ऐकली अन् मुलाचा काळ मागे फिरवला, Video Viral


सम्बन्धित सामग्री