ओट्स खाताना घशात काहीतरी विचित्र जाणवलं; पॅकेट उघडताच बसला धक्का; VIDEO व्हायरल

Viral Video : पॅकेज्ड फूडच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्चचिन्ह उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. चक्क आता योगा बारच्या हाय प्रोटीन ओट्सच्या पॅकेटमध्ये जिंवत किडे आढळून आल्याचा दावा एका महिलेने केला आहे.
ओट्स खाताना घशात काहीतरी विचित्र जाणवलं; पॅकेट उघडताच बसला धक्का; VIDEO व्हायरल
महिलेच्या व्हिडीओने उडवली खळबळ

पॅकेज्ड फूडच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्चचिन्ह उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. चक्क आता योगा बारच्या हाय प्रोटीन ओट्सच्या पॅकेटमध्ये जिंवत किडे आढळून आल्याचा दावा एका महिलेने केला आहे. सध्या या महिलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून इस्टाग्रामवर जोहाना नावाच्या एका युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

प्रकार पाहून बसेल धक्का
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, ती योगा बार हाय प्रोटीन ओट्सचं डार्क चॉकलेट फ्लेवरचे पॅकेट दाखवत आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, ती गेल्या काही दिवसांपासून हेच ओट्स नाश्तासाठी दररोज खात होती. मात्र, नुकतचं ओट्स खात असताना तिला खशात काहीतरी वेगळे आणि विचित्र जाणवले. त्यानंतर तिला संशय आल्याने महिलेने पॅकेट उघडून बारकाईने पाहिले असता, तेव्हा तिला काहीतरी हालचाल करताना दिसले.महिलेने ते जवळून पाहिले असता ओट्समध्ये चक्क लहान जीव रेंगाळत असल्याचा धक्कादायक प्रकार तिच्या लक्षात आला.

महिलेने काय म्हटले?
‘मी यापूर्वीही किती ओट्स खाल्लेले आहेत, याची मला कल्पनाच नाही. मात्र, आता वारंवार माझ्या घशात काहीतरी रेंगाळत असल्यासारखे वाटत आहे. हे पॅकेट उघडल्यानंतर 30 दिवसांच्या आतमध्येच वापरा, अशी सूचना असली तरी देखील इतक्या कमी दिवसांत अशा प्रकारे या उत्पादनात किडे येणे हे अत्यंत धक्कादायक असल्याचे तिने म्हटलेले आहे.

अशा प्रकारच्या उत्पादनांवर अनेकजण विश्वास ठेवतात, त्यामुळे हा सर्व प्रकार समोर आल्यावर आपल्याला धक्का बसला. मात्र, नेकमी याबाबतची तक्रार कुठे करावी हे न कळल्याने हा व्हिडिओ थेट महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, असे तिने सांगितले आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version