Saturday, July 27, 2024 10:53:56 AM

प्रशिक्षणादरम्यान जपानचे दोन हेलिकॉप्टर क्रॅश

प्रशिक्षणादरम्यान जपानचे दोन हेलिकॉप्टर क्रॅश

जपानमध्ये प्रशिक्षणादरम्यान नौदलाचे दोन हेलिकॉप्टर पॅसिफिक महासागरात कोसळले. या घटनेत एक क्रू मेंबर ठार झाला आणि सात बेपत्ता आहेत. याबाबत जपानचे संरक्षण मंत्री मिनोरू किहारा यांनी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, शनिवारी (२० एप्रिल २०२४) रात्री उशिरा तेरिशिमा बेटाजवळ दोन एसएच-६० हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. प्रत्येक हेलिकॉप्टरमध्ये चार जण होते. आठ कर्मचाऱ्यांपैकी एकाला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, अधिकारी अजून सात जणांचा शोध घेत आहेत.

एसएच-६० विमाने सामान्यतः पाणबुडीविरोधी ऑपरेशन्ससाठी विनाशकांवर तैनात केली जातात. जपानी वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, शनिवारच्या (२० एप्रिल २०२४) अपघाताच्या वेळी या भागात हवामानविषयक सूचना जारी करण्यात आल्या नाहीत. विशेष म्हणजे हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती समोर आलेली नाही.


सम्बन्धित सामग्री