Thursday, July 17, 2025 02:44:37 AM

Earthquake In Peru: पेरूला 6.1 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का, पहा व्हिडिओ

भूकंपामुळे जमिन हादरल्याने लोक घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी होती. भूकंपाचा सर्वाधिक परिणाम लिमा शहरात जाणवला.

earthquake in peru पेरूला 61 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का पहा व्हिडिओ
Earthquake In Peru
Edited Image, X

Earthquake In Peru: प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर असलेल्या दक्षिण अमेरिकन देश पेरूमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपामुळे जमिन हादरल्याने लोक घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी होती. भूकंपाचा सर्वाधिक परिणाम लिमा शहरात जाणवला, जिथे खडकांमधून धूळ आणि वाळू उसळली. भूकंपाचे केंद्र राजधानी लिमाच्या पश्चिम दिशेने कॅलाओपासून 23 किलोमीटर (14 मैल) नैऋत्येस आढळले. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) ने भूकंपाची पुष्टी केली. 

भूकंपामुळे एकाचा मृत्यू, अलर्ट जारी - 

प्राप्त माहितीनुसार, भूकंपामुळे एकाचा मृत्यू झाला असून 5 लोक गंभीर जखमी झाले आहेत. रस्ते आणि अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. सरकारने अलर्ट जारी केला असून बचाव पथके पाठवली आहेत. एपी रिपोर्टनुसार, पोलिस अधिकारी रामिरो क्लॉको यांनी सांगितले की, जेव्हा लिमा शहरात भूकंप झाला तेव्हा एक व्यक्ती त्याच्या कारजवळ उभा होता. यावेळी अचानक भूकंपामुळे बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली आणि त्याचा ढिगारा त्याच्यावर पडला. डोक्याला दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

हेही वाचा - अमेरिकेत 2 खासदारांवर घरात घुसून गोळीबार; दोघांचा मृत्यू

दरम्यान, पेरूच्या राष्ट्राध्यक्ष दिना बोलुआर्टे यांनी लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. भूकंपाच्या दृष्टीने पेरू हे एक संवेदनशील केंद्र आहे. पेरूमध्ये सुमारे 34 दशलक्ष लोक राहतात आणि तो प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसलेला देश आहे. पेरू प्रशांत महासागराच्या रिंग ऑफ फायरवर वसलेला आहे, जिथे ज्वालामुखीच्या हालचाली सतत होत राहतात. परिणामी पेरूमध्ये भूकंपाची वारंवारता जास्त आढळून येते. 

पेरूमधील भूकंपाचा व्हिडिओ - 

हेही वाचा - चमत्कार म्हणावा की...योगायोग! 27 वर्षात दोन विमान अपघात केवळ 11 A सीटवर बसलेल्या प्रवाशाचा वाचला जीव

यापूर्वी पेरूमध्ये 2021 मध्ये सर्वात मोठा भूकंप झाला होता. अमेझॉन प्रदेशात झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी होती. तसेच त्यापूर्ली 1970 मध्ये एक मोठा भूकंप झाला होता, ज्यामध्ये सुमारे 66500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 
 


सम्बन्धित सामग्री