शुक्रवारी दक्षिण फिलीपिन्समध्ये 7.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला. किनारी भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोलवर होता. भूकंपाचे केंद्र किनारपट्टीच्या भागात असल्याने समुद्रात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे जी त्सुनामीचे रूप घेऊ शकते.
हेही वाचा - UK PM On Aadhaar System : ब्रिटनमध्येही सुरु होणार आधारसारखी डिजिटल ओळख प्रणाली; पंतप्रधान स्टारमरनं दिली माहिती, म्हणाले...
सध्या भूकंपामुळे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. संबंधित संस्थांचे म्हणणे आहे की आणखी भूकंप होण्याची शक्यता आहे. भूकंपानंतरच्या धक्क्यांमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीचा इशारा एजन्सींनी दिला आहे. अमेरिकेच्या त्सुनामी वॉर्निंग सिस्टीमने म्हटले आहे की भूकंपाच्या केंद्रापासून 300 किलोमीटर अंतरावर जीवघेणी त्सुनामी येऊ शकते. पुढील दोन तासांत समुद्रात त्सुनामीच्या लाटा उसळू शकतात, असे फिव्होल्क्सचे म्हणणे आहे.