Sunday, June 15, 2025 11:18:01 AM

भारतानंतर आता 'या' देशात भयानक दहशतवादी हल्ला! जिहादींनी 100 हून अधिक लोकांची केली हत्या

भारतातील पहलगाम येथील दहशतवादाची घटना ताजी असतानाचं आता पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासोमध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, ज्यामध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

भारतानंतर आता या देशात भयानक दहशतवादी हल्ला जिहादींनी 100 हून अधिक लोकांची केली हत्या
Burkina Faso Terror Attack प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

Burkina Faso Terror Attack: दहशतवाद हा संपूर्ण जगासमोरील मोठी प्रश्न आणि आव्हानात्मक प्रश्न आहे. जगातील विविध देशांमध्ये दहशतवादी घटना सातत्याने घडत आहेत. भारतातील पहलगाम येथील दहशतवादाची घटना ताजी असतानाचं आता पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासोमध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, ज्यामध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी बहुतेक सैनिक होते. रविवारी सकाळी हा हल्ला झाला. जिहादी गटाने अनेक ठिकाणांना लक्ष्य केले, ज्यात एक लष्करी तळ आणि शहर जिबो यांचा समावेश आहे.

'या' संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी  - 

उत्तर बुर्किना फासोमधील दहशतवादी हल्ला जमात नसर अल-इस्लाम वाल-मुस्लिमीन किंवा जेएनआयएम या अल-कायदाशी संबंधित जिहादी गटाने केला होता. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारीही या संघटनेने घेतली आहे. ही दहशतवादी संघटना आफ्रिकेतील साहेल प्रदेशात सक्रिय मानली जाते. गेल्या काही काळापासून, बुर्किना फासो हे हिंसक अतिरेकीपणाचे जागतिक आकर्षण केंद्र म्हणून ओळखले जात आहे.

हेही वाचा - भारत-पाकिस्तान तणावात चीनची मोठी खेळी! तालिबानला हाताशी धरून भारताला घेरण्याचा भयंकर डाव

8 ठिकाणी एकाच वेळी दहशतवादी हल्ला - 

बुर्किना फासोची लोकसंख्या सुमारे 23 दशलक्ष आहे. हा देश आफ्रिकेतील साहेल प्रदेशात आहे. रविवारी, दहशतवाद्यांनी सकाळी 6 वाजता वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी दहशतवादी हल्ले सुरू केले. बुर्किना फासो हवाई दलाला पांगवण्यासाठी दहशतवाद्यांनी एकाच वेळी आठ भागात हल्ला केला.

हेही वाचा - युद्धबंदीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे आणखी एक विधान; म्हणाले, 'काश्मीरवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार'

जिबो शहरावर हल्ला - 

प्राप्त माहितीनुसार, दहशतवाद्यांनी जिबोमध्ये मुख्य हल्ला केला. त्यांनी लष्करी छावण्या आणि तेथील दहशतवाद विरोधी युनिटच्या छावणीवर हल्ला करण्यापूर्वी शहरातील सर्व प्रवेशद्वारांवर नियंत्रण मिळवले. याआधीही जिबो शहरावर हल्ला झाला होता. परंतु, त्यावेळी सुरक्षा दलांनी अतिरेक्यांना यशस्वीरित्या हुसकावून लावले होते.
 


सम्बन्धित सामग्री