Pakistan PM Shehbaz Sharif
Edited Image, X
इस्लामाबाद: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भारताने दिलेल्या तीव्र प्रतिउत्तरानंतर पाकिस्तानला चांगलाचं झटका बसला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानने अनेक आदेश जारी केले आहेत. भारतीय विमान कंपन्यांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद करण्याबरोबरच, भारतासोबत होणारा व्यापारही थांबवला. मात्र, आता पाकिस्तानला या निर्णयाची मोठी किंमत मोजावी लागू शकते.
औषधांचा पुरवठा सुरक्षित करण्यासाठी आपत्कालीन योजना -
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतासोबतचा व्यापार पूर्णपणे थांबवल्यानंतर पाकिस्तानच्या औषध क्षेत्राला मोठा धक्का बसू शकतो. पाकिस्तानमधील अनेक आरोग्य अधिकाऱ्यांनी औषधांचा पुरवठा सुरक्षित करण्यासाठी आपत्कालीन योजना आखण्यास सुरुवात केली आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, भारतासोबतचा व्यापार थांबवल्यानंतर पाकिस्तानने आपल्या औषधांच्या गरजा पूर्ण करण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी अधिकारी औषधे पुरवण्यासाठी आपत्कालीन तयारी करत आहेत.
पाकिस्तानला जाणवणार औषधांचा तुटवडा -
पाकिस्तानच्या औषध नियामक प्राधिकरणाने (DRAP) देखील याची पुष्टी केली आहे. याबाबत कोणतीही औपचारिक सूचना जारी करण्यात आलेली नसली तरी, भारतासोबतचा व्यापार थांबवला तर पाकिस्तानमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. पाकिस्तानला औषधांचा पुरवठा करण्यासाठी DRAP इतर देशांकडे वळू शकते.
हेही वाचा - भारतीय सैन्याची मोठी कारवाई! पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचे घर उद्ध्वस्त
एका वरिष्ठ DRAP अधिकाऱ्याने सांगितले की, 2019 मध्येही अशीच वेळ आली होती. जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आले होते, ज्याच्या निषेधार्थ पाकिस्ताननेही अशीच पावले उचलली होती. तेव्हापासून आम्ही आणीबाणीची तयारी सुरू केली. देशातील औषधांचा तुटवडा भरून काढण्यासाठी आम्ही पर्यायी मार्ग शोधत आहोत.
हेही वाचा - 'पाणी थांबवले तर...130 अण्वस्त्रे तयार आहेत'; पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला धमकी
औषधांसाठी पाकिस्तान भारतावर अवलंबून -
दरम्यान, औषधांची मागणी पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान मोठ्या प्रमाणात औषधी कच्चा माल आयात करतो. पाकिस्तान 30-40 टक्के कच्च्या मालासाठी भारतावर अवलंबून आहे. भारत पाकिस्तानला सक्रिय औषध घटक (API) सह अनेक वैद्यकीय उत्पादने निर्यात करतो. आता, भारतासोबतचा व्यापार थांबल्यानंतर, DRAP चीन, रशिया आणि युरोपीय देशांमध्ये त्याचा पर्याय शोधत आहे.