Thursday, February 12, 2026 04:29:25 PM

Helicopter Crash: मोठी बातमी! हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

एका गोळीबाराच्या घटनेत स्थानिक पोलिसांना हवाई मदत पुरवण्यासाठी निघालेले 'रेंजर' हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठा अपघात झाला.

helicopter crash मोठी बातमी हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले पायलटसह पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Helicopter Crash: राष्ट्रावादी काँग्रेस नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी ताजी असताना आता आणखी एक अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका गोळीबाराच्या घटनेत स्थानिक पोलिसांना हवाई मदत पुरवण्यासाठी निघालेले 'रेंजर' हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात हेलिकॉप्टरमधील पायलट आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सार्वजनिक सुरक्षा विभागाच्या (DPS) मालकीचे हे हेलिकॉप्टर फ्लॅगस्टाफ परिसरात मोहिमेवर असताना ही दुर्घटना घडली. अमेरिकेतील अ‍ॅरिझोना राज्यात हा भीषण अपघात घडला.  

मोहिमेदरम्यान झाला भीषण अपघात
अ‍ॅरिझोना सार्वजनिक सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅगस्टाफ पोलीस विभाग एका गोळीबाराच्या घटनेचा तपास करत असताना त्यांना मदतीसाठी 'रेंजर' हेलिकॉप्टर क्रूला पाचारण करण्यात आले होते. हे हेलिकॉप्टर सामरिक हवाई सहाय्य (Tactical Air Support) आणि देखरेखीचे काम करत होते. मात्र, ऑपरेशन सुरू असतानाच अचानक हेलिकॉप्टर कोसळले. विभागाचे सार्जंट कॅमेरॉन ली यांनी अधिकृत निवेदनात या घटनेला दुजोरा दिला असून, 'पायलट आणि पोलीस अधिकारी/पॅरामेडिक अशा दोघांनाही आम्ही गमावले आहे,' असं त्यांनी सांगितलं आहे.   

हेही वाचा - World Responsible Nations : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! या यादीत पटकावले स्थान; जगातल्या महासत्ताही पडल्या बाहेर

हवाई बचाव युनिटसाठी मोठा धक्का
रेंजर युनिट म्हणून ओळखले जाणारे हे हवाई बचाव दल अत्यंत विशेष प्रशिक्षित असते. डोंगरदऱ्यातील बचाव कार्य, पाण्यातील आपत्कालीन शोध मोहीम आणि उच्च-जोखीम असलेल्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये हे दल सुरक्षितपणे काम करण्यासाठी ओळखले जाते. जीवघेण्या परिस्थितीतही लोकांसाठी ढाल बनणाऱ्या या युनिटचे दोन सदस्य अशा प्रकारे मृत्यूमुखी पडणे, हा विभागासाठी आणि हवाई बचाव दलासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

चौकशीचे आदेश; कारण अद्याप अस्पष्ट
या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) या संस्थांच्या सहकार्याने तपास सुरू करण्यात आला आहे. मृत पायलट आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना अधिकृत माहिती दिल्यानंतरच त्यांची नावे सार्वजनिक केली जाणार आहेत. या दुर्घटनेत जमिनीवर कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या