Strait of Hormuz Closed: मोठी बातमी! होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; इराणने ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

इराणच्या संयुक्त लष्करी मुख्यालयाने शनिवारी जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) पुन्हा एकदा बंद करण्याची घोषणा केली आहे.

Strait of Hormuz Closed: मोठी बातमी! होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; इराणने ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

Strait of Hormuz Closed: मध्यपूर्वेतील तणाव निवळण्यासाठी अमेरिका आणि इराण दरम्यान झालेल्या तात्पुरत्या करारानंतरही परिस्थिती पुन्हा चिघळली आहे. इराणच्या संयुक्त लष्करी मुख्यालयाने शनिवारी जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) पुन्हा एकदा बंद करण्याची घोषणा केली आहे. लेबनॉनमधील इस्रायलचे सुरू असलेले हल्ले आणि युद्ध संपवण्याच्या आश्वासनांचे अमेरिकेकडून झालेले 'स्पष्ट उल्लंघन' यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे इराणने म्हटले आहे. "जर ही आक्रमकता अशीच सुरू राहिली, तर पुढील कडक कारवाईची योजना तयार आहे," असा इशारा इराणने सरकारी दूरचित्रवाणीवरून दिला आहे.

'आश्वासनांची पूर्तता झाल्याशिवाय वाटाघाटी नाही'
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी स्पष्ट केले की, अमेरिका आपल्या कराराचे प्रामाणिकपणे पालन करत असल्याची खात्री पटत नाही, तोपर्यंत शांतता प्रक्रियेत कोणतीही प्रगती होणार नाही. लेबनॉनमधील संघर्ष पूर्णपणे थांबवण्यासह इतर प्रमुख आश्वासनांची पूर्तता झाल्यानंतरच अंतिम करारासाठी वाटाघाटी केल्या जातील. "कराराचा कोणताही एक भाग जरी अंमलात आणला गेला नाही, तर संपूर्ण करार धोक्यात येईल," असे बघाई यांनी बजावले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या करारानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत झाली होती, मात्र आता ती पुन्हा ठप्प झाली आहे.

युद्धविरामानंतर काही तासांतच इस्रायलचा भीषण हल्ला
शांतता कराराची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच शनिवारी इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर भीषण हवाई हल्ले केले. या ताज्या हल्ल्यांमध्ये दोन निष्पाप मुलांसह किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या नव्या हिंसाचारामुळे अमेरिका-इराणमधील नाजूक कराराच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे, इस्रायलच्या एका लष्करी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, हिजबुल्लाने रात्रीच्या वेळी दक्षिण लेबनॉनमधील इस्रायली सैन्यावर 50 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली होती. याला प्रत्युत्तर म्हणून लष्कराने हिजबुल्लाचे कमांड सेंटर्स आणि रॉकेट लाँच साइट्स उद्ध्वस्त केल्या आहेत.

हेही वाचा – UAE Visa Services: भारतीय प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; UAE मध्ये 'या' 5 दिवसांसाठी पासपोर्ट आणि व्हिसा सेवा पूर्णपणे बंद

इस्रायल आणि हिजबुल्लाकडून एकमेकांवर कराराच्या उल्लंघनाचा आरोप
शुक्रवारी वॉशिंग्टनमधील इस्रायलचे राजदूत येचिएल लीटर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत, हिजबुल्लाने हल्ले थांबवल्यास इस्रायल 'तात्काळ युद्धविरामासाठी पूर्णपणे कटिबद्ध' असल्याचे म्हटले होते. मात्र, शनिवारी हिजबुल्लाने इस्रायलवरच कराराच्या चिंधड्या उडवल्याचा आरोप केला. हिजबुल्लाच्या लष्करी शाखेने जाहीर केले की, ते युद्धविरामाचे पालन करण्यास वचनबद्ध आहेत, परंतु इस्रायली सैन्याकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा अधिकार त्यांना आहे. या दोन्ही बाजूंमधील थेट संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number