Saturday, June 14, 2025 04:17:35 AM

मोठा खुलासा! असीम मुनीरचं होता पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील मास्टरमाइंड?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे केवळ पाकिस्तानचे लष्करप्रमुखच नव्हे तर पाकिस्तानी लष्कराचे 4-5 उच्च अधिकारीही सहभागी होते. पाकिस्तानी लष्करात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने याबाबत मोठा खुलासा केला आहे.

मोठा खुलासा असीम मुनीरचं होता पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील मास्टरमाइंड
Mastermind behind Pahalgam terror attack
Edited Image

इस्लामाबाद: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सर्वात मोठा खुलासा झाला आहे. याबाबत मोठा पुरावाही समोर आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल असीम मुनीर असल्याचं सांगण्यात येत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे केवळ पाकिस्तानचे लष्करप्रमुखच नव्हे तर पाकिस्तानी लष्कराचे 4-5 उच्च अधिकारीही सहभागी होते. पाकिस्तानी लष्करात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने याबाबत मोठा खुलासा केला आहे. लष्करप्रमुख आणि पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी या दहशतवादी हल्ल्यात थेट सहभागी होते, असा खळबळजनक दावा या अधिकाऱ्याने केला आहे. 

माजी लष्कर अधिकारी आदिल राजा यांचा मोठा खुलासा - 

पाकिस्तानी लष्कराचे माजी मेजर आदिल राजा यांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना पाठिंबा देते. लष्कर पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या हँडलर्सद्वारे भारतात काश्मीरमध्ये रक्तरंजित खेळ खेळते. आदिल राजा यांच्या विधानावरून आता हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग होता आणि लष्करप्रमुख असीम मुनीर देखील यात  सहभागी होते आणि तेच या हल्ल्याचा सूत्रधार होते.

हेही वाचा - मोठी बातमी! पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या ज्योती मल्होत्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मेजर आदिल राजा यांनी सांगितलं की, मला माहित आहे की कोणत्या आयएसआय अधिकाऱ्यांनी हे केले. पण हे लोक मागे हटत नव्हते. असीम मुनीरने हे ऑपरेशन करण्यासाठी एक चाल चालवली होती. भारताकडून झालेल्या पराभवानंतर असीम मुनीर अस्वस्थ झाला होता आणि तो आपले स्थान वाचवण्यासाठी काहीतरी मोठे करू इच्छित होता. 

हेही वाचा - संपूर्ण भारतीयांना अभिमान असणाऱ्या 'ऑपरेशन सिंदूर'चा लोगो कोणी डिझाइन केला?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मुनीरसोबत दोन अधिकारी -

पहलगाम दहशतवादी हल्ला करण्यात डीजी आयएसआय मोहम्मद असीम मलिक आणि मोहम्मद शहाब असलम यांचा सहभाग असल्याचं मेजर आदिल राजा यांनी नमूद केलं आङे. यातील मोहम्मद शहाब असलम यांची पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात सर्वात थेट भूमिका होती, ते हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी थेट संपर्कात होते, असा खळबळजनक दावाही आदिल राजा यांनी केला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री