Boeing-737 Viral Video: अहमदाबाद विमान अपघातात एअर इंडियाच्या विमानातील 241 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. आता आणखी एक बोईंग-737 विमान अपघातातून थोडक्यात बचावले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना इंडोनेशियातील टांगेरंग प्रांतातील आहे. टांगेरंगच्या सोएकार्नो हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावर खराब हवामानामुळे विमान अपघातातून बचावले. बाटिक एअरलाइनचे विमान उतरत असताना पायलटचा धावपट्टीवर विमानावरील ताबा सुटला, परंतु पायलटने वेळीच विमान नियंत्रित केले आणि विमान अपघात होण्यापासून वाचले. विमानतळावर उभ्या असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा - अजब प्रकार; मद्यपी महिलेने चालवली रेल्वे रुळावर गाडी
लँडिंग करताना एका बाजूला झुकले विमान -
खराब हवामान, मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे विमान धावपट्टीवर उतरताना एका बाजूला झुकले. हे विमान पीके-एलडीजे बाटिक एअरलाइन्सची होते. एअरलाइन्सचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स स्ट्रॅटेजिक ऑफिसर दानांग मंडला प्रिहंतोरो यांनी घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की, एअरलाइन्सचे बोईंग-737 विमान मुसळधार पावसात विमानतळावर उतरले, परंतु धावपट्टीवर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे विमान एका बाजूला झुकले. परंतु पायलटने विमान नियंत्रित केले आणि सुरक्षित लँडिंग केले.
बोईंग-737 विमान अपघातातून थोडक्यात बचावले, पहा व्हिडिओ -
हेही वाचा - ऐकावं ते नवलचं! न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीला पठ्ठ्याने चक्क टॉयलेट सीटवर बसून लावली हजेरी; व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, अभियंत्यांच्या पथकाने विमानाची तपासणी केली, परंतु विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. विमान उड्डाणासाठी वापरले जाऊ शकते. बाटिक एअरलाइन्सची प्राथमिकता प्रवाशांची सुरक्षा आहे, असंही विमान कंपनीने म्हटलं आहे. तथापी, या विमानाचा लँडिंग करतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.