Sunday, February 08, 2026 03:37:04 PM

Bomb Blast in Pakistan: पाकिस्तानच्या क्वेटामध्ये बॉम्बस्फोट; 6 जणांचा मृत्यू, 19 जखमी

या शक्तिशाली बॉम्बस्फोटात किमान सहा जणांचा मृत्यू झाला. तसेच 19 जण जखमी झाले. हा स्फोट झरघून रोडजवळ झाला.

bomb blast in pakistan पाकिस्तानच्या क्वेटामध्ये बॉम्बस्फोट 6 जणांचा मृत्यू 19 जखमी

Bomb Blast in Pakistan: पाकिस्तानच्या क्वेटामध्ये मंगळवारी एका शक्तिशाली बॉम्बस्फोटात किमान सहा जणांचा मृत्यू झाला. तसेच 19 जण जखमी झाले. हा स्फोट झरघून रोडजवळ झाला. तथापी, स्फोटानंतर जोरदार गोळीबारही झाला, ज्यामुळे सुरक्षा दलांनी शहरातील रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर केली.

हेही वाचा - H1b Visa Policy New Update : H-1B गोंधळात भारतीयांना जर्मनीचा आधार; ‘स्थिर व उदार’ स्थलांतर धोरणांची हमी

पोलिसांनी सांगितले की, स्फोट इतका जोरदार होता की जवळच्या इमारतींच्या खिडक्या आणि दरवाजे तुटले. सुरक्षा दलांनी तात्काळ परिसराला वेढा घातला. स्फोटानंतर फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बलुचिस्तानचे आरोग्य मंत्री बख्त मुहम्मद काकर यांनी सर्व रुग्णालयांमध्ये तातडीची तयारी करण्याचे आदेश दिले, तसेच डॉक्टर, फार्मासिस्ट, परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनी तात्काळ कर्तव्यावर हजर व्हावे, अशी सूचना दिली. 

हेही वाचा - P Chiambaram on Mumbai 26/11 Attack : '...म्हणून भारतानं कारवाई केली नाही'; 26/11 हल्ल्यााबाबत पी. चिदंबरम यांचा खळबळजनक खुलासा

स्थानीय मीडिया वृत्तानुसार, हा स्फोट आत्मघाती हल्ला असल्याची शक्यता आहे. घटनास्थळी फुटेजमध्ये दूरवरून उठणारे धुराचे लोट दिसले आहेत. दरम्यान, 4 सप्टेंबर रोजी क्वेटामध्ये एका राजकीय रॅलीदरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात 15 जणांचा मृत्यू आणि 30 हून अधिक जखमी झाले होते. सुरक्षा दलांनी सध्या चौकशी सुरू केली असून, स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.


सम्बन्धित सामग्री