Donald Trump's Warning to Israel: गेल्या पंधरवड्यापासून इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात अमेरिकेच्या प्रवेशानंतर इराणने त्यांच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत इराणने अमेरिकेच्या अनेक आखाती देशांमधील लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली होती. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीची घोषणा केली. मात्र, यानंतर इराणने इस्रायल आणि अमेरिकन तळांवर हल्ले सुरू ठेवले आहेत. त्याचप्रमाणे इस्रायल देखील इस्रायलवर सतत हल्ले करत आहे.
इराण आणि इस्रायलकडून युद्धबंदीचे उल्लंघन -
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, इराण आणि इस्रायल युद्धबंदीचे उल्लंघन करत आहेत. आम्हाला हे युद्ध ओढायचे नाही. युद्धबंदी दरम्यान हल्ला करणे योग्य नाही. इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे नष्ट झाला आहे. तो आता कधीही अणुशक्ती बनू शकणार नाही. अशा परिस्थितीत दोन्ही देशांनी युद्धबंदीचे पालन करावे, परंतु त्याचे उल्लंघन केले जात आहे.
हेही वाचा - इराणमधील 'हा' अणुऊर्जा प्रकल्प आहे सर्वात धोकादायक! रेडिएशन लीक झाल्यास 5 आखाती देशातील लोकांचा होऊ शकतो मृत्यू
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, 'इस्रायल आता माघार घेत आहे याचा मला आनंद नाही. मला वाटते की समुद्रात एक रॉकेट डागण्यात आले आणि कदाचित त्याचे लक्ष्य चुकले. इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदी झाली. त्यानंतर इस्रायलने हल्ला केला. हे मला आवडलेले नाही.'
हेही वाचा - 'युद्धविराम आता सुरू झाला आहे, तो मोडू नका'; ट्रम्प यांचे इराण आणि इस्रायलला आवाहन
इस्रायलने काय म्हटले?
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी इराणविरुद्ध हल्ले थांबवले आहेत. यापूर्वी, इस्रायलने म्हटले होते की युद्धबंदी सुरू झाल्यानंतर इराणने क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इस्रायली सैन्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे निर्देश दिले होते. काट्झ म्हणाले होते की इराणने युद्धबंदी लागू झाल्यानंतर क्षेपणास्त्र हल्ले करून युद्धबंदीचे पूर्णपणे उल्लंघन केले आहे.