Tuesday, March 10, 2026 05:50:52 AM

China About Indian Pharma : चीनचा मोठा निर्णय! भारतीय औषधांवरील सर्व शुल्क पूर्णपणे रद्द

आतापर्यंत भारतीय औषधांवर 30 टक्के आयात शुल्क आकारणाऱ्या चीनने हे शुल्क पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा केली आहे.

china about indian pharma  चीनचा मोठा निर्णय भारतीय औषधांवरील सर्व शुल्क पूर्णपणे रद्द

China Removes Import Duty on Indian Pharma: भारतीय औषध उद्योगाला मोठा दिलासा देणारा निर्णय चीनकडून घेण्यात आला आहे. आतापर्यंत भारतीय औषधांवर 30 टक्के आयात शुल्क आकारणाऱ्या चीनने हे शुल्क पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा केली आहे. यामुळे भारतीय कंपन्या आता कोणत्याही सीमाशुल्काशिवाय औषध उत्पादने चीनमध्ये निर्यात करू शकतील. ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय औषध कंपन्यांवर 100 टक्के पर्यंत शुल्क लादले आहे. चीनचा हा निर्णय ट्रम्पविरोधी आंतरराष्ट्रीय धोरणाचा भाग मानला जात आहे.

चीन-भारत व्यापाराचे नवीन पर्व

चीनने यापूर्वी भारतीय गुंतवणुकीसाठी दारं उघडण्याची भूमिका घेतली होती. अलीकडेच चीनचे राजदूत आणि भारतीय परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची बैठक झाल्यानंतर व्यापार करार पुन्हा गतीमान होण्याचे संकेत मिळाले होते. आता औषध क्षेत्रावरील शुल्क रद्द करून चीनने भारतीय कंपन्यांना थेट संधी दिली आहे.

भारतीय औषध उद्योगासाठी मोठा फायदा

भारताला 'जगाची फार्मसी' म्हटले जाते, कारण येथे उत्पादित होणारी जेनेरिक औषधे आणि लसी जगभरात पुरवल्या जातात. मात्र, चीनच्या 30 टक्के शुल्कामुळे भारतीय औषधांची किंमत वाढत होती. आता शून्य शुल्कामुळे अब्जावधी डॉलर्सच्या नवीन निर्यात संधी निर्माण होणार आहेत.

हेही वाचा - Narendra Modi-Giorgia Meloni’: जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिली; मेलोनी यांची 'मन की बात'...

रोजगार व निर्यातीत वाढ 

तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे भारत-चीन व्यापार संतुलनात सुधारणा होईल. भारतीय औषध निर्यातीत मोठी वाढ होईल, ज्यामुळे देशात रोजगार निर्मिती आणि कॉर्पोरेट उत्पन्न दोन्ही वाढणार आहे.

हेही वाचा - PM Modi VS Moshin Naqvi : आशिया कप ट्रॉफीप्रकरण; मोहसिन नकवी बरळला, 'युद्ध हे अभिमानाचे माप असेल तर...'

जागतिक आरोग्य सेवेत भारताचे स्थान बळकट

अमेरिकन बाजारपेठेतील अडथळ्यानंतर चीनमधील ही मोठी सवलत भारताच्या औषध क्षेत्राला नवी दिशा देणार आहे. यामुळे जागतिक आरोग्य सेवेत भारताची भूमिका अधिक मजबूत होण्यात मदत होणार आहे. तसेच परवडणारी औषधे जगभरात सहज उपलब्ध होतील. नच्या या निर्णयामुळे भारतीय औषध उद्योगाला दिलासा मिळणार असून तो आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी गेम चेंजर ठरू शकतो. 


सम्बन्धित सामग्री