China floods 2026: चीनमध्ये निसर्गाचा कोप! शांघाय, बीजिंग पाण्यात बुडाले; मुसळधार पाऊस अन् भीषण पुरामुळे 28 लाख नागरिकांचे स्थलांतर

आर्थिक राजधानी शांघाय आणि राजधानी बीजिंगमधील रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणी दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी साचल्याचे भयावह चित्र आहे.

China floods 2026: चीनमध्ये निसर्गाचा कोप! शांघाय, बीजिंग पाण्यात बुडाले; मुसळधार पाऊस अन् भीषण पुरामुळे 28 लाख नागरिकांचे स्थलांतर

Shanghai Beijing Torrential Rain Flood: जागतिक हवामान बदलाचा (Climate Change) भीषण फटका सध्या चीनला बसत असून देशातील अनेक प्रमुख शहरांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जुलै महिन्यापासून सुरू असलेल्या धुवांधार पावसाने चीनमधील जनजीवन पूर्णपणे विसकळीत केले आहे. आर्थिक राजधानी शांघाय आणि राजधानी बीजिंगमधील रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणी दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी साचल्याचे भयावह चित्र आहे. या अतिवृष्टीमुळे वाहतूक यंत्रणा ठप्प झाली असून शहरातील पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

'बावी' वादळानंतर 46 नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
या वर्षातील अत्यंत शक्तिशाली मानल्या गेलेल्या 'बावी' वादळाच्या प्रभावामुळे उत्तर आणि ईशान्य चीनमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. सध्या चीनमधील तब्बल 46 नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. वेगवान पाण्याच्या प्रवाहात अनेक वाहने वाहून गेली असून महामार्ग आणि रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये स्थानिक नागरिक पॅडल बोर्डच्या साहाय्याने प्रवास करताना तर काही जण तुडुंब भरलेल्या रस्त्यांवर पोहताना दिसून येत आहेत.

हेही वाचा – Dead Bodies Found: भयंकर दुर्गंधीमुळे लोक झाले त्रस्त; शोध घेतल्यानंतर समोर आलं हादरवणारं वास्तव, सडलेले 56 मृतदेह पाहून पोलीसही..

28 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले; मदतकार्य सुरू
पुराच्या या भीषण संकटामुळे सुमारे 28 लाख लोकांना आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला आहे. आपत्कालीन यंत्रणा आणि प्रशासकीय पथके बचावकार्यात अहोरात्र गुंतलेली आहेत. मात्र, सातत्याने होणारा मुसळधार पाऊस आणि पाण्याचा प्रचंड वेग यामुळे मदतकार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे चीनमधील लाखो नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे कोलमडून पडले आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; हवामान बदलावर जागतिक चर्चा
नेटकऱ्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर बीजिंग आणि शांघायमधील पुराचे हादरवणारे व्हिडिओ शेअर केले आहेत. 2 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर बीजिंगमधील गाड्या पाण्यात बुडाल्याचे दृश्य एका युझरने पोस्ट केले आहे. केवळ भारतच नव्हे, तर चीनसारख्या विकसित देशांनाही हवामान बदलाचा किती मोठा फटका बसत आहे, यावर जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – School Firing: घरी आजी-आजोबांना गोळ्या घातल्या, नंतर शाळेतही केला बेछूट गोळीबार; 8 जणांचा मृत्यू तर 15 जखमी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number