Monday, June 23, 2025 11:48:18 AM

धक्कादायक! कोलंबियाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर निवडणूक प्रचारादरम्यान गोळीबार

कोलंबियामध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत, त्यामुळे उरीबे यांना विजयाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. उरीबे हे विरोधी पक्ष सेंट्रो डेमोक्रॅटिको कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे सदस्य आहेत.

धक्कादायक कोलंबियाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर निवडणूक प्रचारादरम्यान गोळीबार
Colombian presidential candidate Miguel Uribe Turbay
Edited Image

Colombian Presidential Candidate Shot: कोलंबियाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. उरीबे यांच्यावर हा हल्ला झाला तेव्हा ते बोगोटा येथील एका रॅलीला संबोधित करत होते. कोलंबियामध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत, त्यामुळे उरीबे यांना विजयाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. उरीबे हे विरोधी पक्ष सेंट्रो डेमोक्रॅटिको कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे सदस्य आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी हल्लेखोराला अटक केली आहे.

हेही वाचा - मुख्य सल्लागार युनूस यांची घोषणा; बांगलादेशात होणार एप्रिल 2026 मध्ये निवडणुका

या प्रकरणात माहिती देताना बोगोटाचे महापौर म्हणाले की, हा हल्ला शहरातील फोंटिबोन परिसरात झाला. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातील रुग्णालये सतर्क आहेत. ट्रम्प सरकारमधील परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, आम्ही हत्येच्या प्रयत्नाचा निषेध करतो. हा हल्ला लोकशाहीसाठी धोका आहे. उरीबे हे कोलंबियाचे एक प्रसिद्ध नेते आहेत. त्यांचे वडील व्यापारी होते. तर त्यांची आई एक प्रसिद्ध पत्रकार होती. 

हेही वाचा - द अमेरिका पार्टी…! ट्रम्पसोबत वाद झाल्यानंतर एलोन मस्कने घेतला मोठा निर्णय; स्वत:चा राजकीय पक्ष सुरू करणार

दरम्यान,डेमोक्रॅटिक सेंटर पक्षाने एक निवेदन जारी करून याला क्रूर हिंसाचार म्हटले आहे. तथाीपि, हे अस्वीकार्य कृत्य असल्याचेही म्हटले आहे. त्यांच्या पक्षाने म्हटले आहे की हा हल्ला फॉन्टीबॉन परिसरातील एका उद्यानात झाला, जेव्हा सशस्त्र हल्लेखोरांनी त्याच्यावर मागून गोळीबार केला. बोगोटाचे महापौर कार्लोस गॅलन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की संशयित गोळीबार करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक अधिकारी आणि पोलिस पथके संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. हल्लेखोराची चौकशी केली जात आहे.


सम्बन्धित सामग्री