US – Iran War: आखाती देशातील युद्धामुळे भारतावर डेटा संकट? होमुझ तणाव वाढल्यास इंटरनेट कोलमडण्याची शक्यता

इंटरनेट सेवा बाधित झाल्यास त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना आणि कॉर्पोरेट क्षेत्राला बसणार आहे.

US – Iran War: आखाती देशातील युद्धामुळे भारतावर डेटा संकट? होमुझ तणाव वाढल्यास इंटरनेट कोलमडण्याची शक्यता

US – Iran War: मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आता भारतावर मोठे ‘डेटा संकट’ ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. होमुझ सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) तणाव वाढल्यास जागतिक इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. समुद्राखाली असलेल्या सबमरीन फायबर ऑप्टिक केबलच्या मोठ्या जाळ्याला या युद्धामुळे धोका पोहोचू शकतो. जर या केबल्सना हानी पोहोचली, तर आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी पूर्णतः प्रभावित होऊन डेटा ट्रान्सफरची प्रक्रिया थांबण्याची चिन्हं आहेत.

भारताचे 33 टक्के इंटरनेट ट्राफिक धोक्यात
या संभाव्य संकटामुळे भारताचे तब्बल 33 टक्के इंटरनेट ट्राफिक धोक्यात आले आहे. भारताचा मोठा इंटरनेट डेटा हा याच समुद्री मार्गांतून जाणाऱ्या केबल्सवर अवलंबून आहे. जर हे जाळे विस्कळीत झाले, तर देशाचा उर्वरित जगाशी असलेला डिजिटल संपर्क तुटू शकतो. हे संकट केवळ तांत्रिक नसून आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्याही अत्यंत गंभीर मानले जात आहे, कारण आधुनिक भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर डिजिटल कनेक्टिव्हिटीवर उभी आहे.

ई-मेलपासून बँकिंगपर्यंत सर्वच सेवांवर परिणाम
इंटरनेट सेवा बाधित झाल्यास त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना आणि कॉर्पोरेट क्षेत्राला बसणार आहे. यात प्रामुख्याने ई-मेल सेवा, ऑनलाईन बँकिंग व्यवहार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि व्हिडिओ कॉलिंग यांसारख्या अत्यावश्यक सेवा विस्कळीत होऊ शकतात. विशेषतः बँकिंग आणि आर्थिक व्यवहार पूर्णपणे इंटरनेटवर आधारित असल्याने, मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारांना ब्रेक लागण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Ayatollah Khamenei Wife, US-Israel VS Iran War : आयातुल्ला खामेनी यांची पत्नी मन्सूरेह जिवंत? इराणच्या माध्यमांचा दावा

समुद्राखालील फायबर ऑप्टिक केबलचे महत्त्व
जगभरातील 95 टक्के पेक्षा जास्त डेटा हा समुद्राखालील फायबर ऑप्टिक केबल्सद्वारे ट्रान्सफर केला जातो. होमुझ आणि आजूबाजूचा समुद्री भाग हा या केबल्ससाठी अत्यंत महत्त्वाचा ‘जंक्शन’ पॉईंट आहे. युद्धाच्या परिस्थितीत या केबल्सना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाण्याची किंवा अपघाताने हानी पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत भारताला पर्यायी मार्गांचा विचार करावा लागणार आहे, अन्यथा डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मोठा फटका बसू शकतो.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number