काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना! 305 लोकांना घेऊन जाणारी नाव उलटली; 15 मुलांसह 109 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 116 अजूनही बेपत्ता

या भीषण दुर्घटनेतून 80 पेक्षा जास्त प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. सुमारे 116 हून अधिक प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत.

काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना! 305 लोकांना घेऊन जाणारी नाव उलटली; 15 मुलांसह 109 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 116 अजूनही बेपत्ता
boat capsizes

Jibouti Boat Capsizes: पूर्व आफ्रिकेतील जिबूती किनाऱ्याजवळ एक अत्यंत भीषण आणि काळीज पिळवटून टाकणारी सागरी दुर्घटना घडली आहे. जवळपास 305 स्थलांतरितांना घेऊन येमेनच्या दिशेने जाणारी एक नाव शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान समुद्रात उलटली. या भीषण अपघातात कमीत कमी 109 प्रवाशांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून 116 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आपत्कालीन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून समुद्रात शोध व बचाव मोहीम वेगाने राबवली जात आहे.

दुर्घटनेतील जीवितहानी आणि बचावकार्याची माहिती
इंटरनेशनल ऑर्गनाइजेशन फॉर माइग्रेशन (IOM) ने दिलेल्या माहितीनुसार या अपघातातील आकडेवारी आणि सद्यस्थितीनुसार, मृत्यू पावलेल्या 109 स्थलांतरीत लोकांमध्ये 52 पुरुष, 42 महिला आणि 15 लहान मुलांचा समावेश आहे. या भीषण दुर्घटनेतून 80 पेक्षा जास्त प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. सुमारे 116 हून अधिक प्रवासी अजूनही समुद्रात बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! जगात तिसऱ्या युद्धाचा भडका; 24 तासांत तब्बल 1900 हून अधिक भीषण हल्ले, सौदीच्या मदतीने..

हॉर्न ऑफ आफ्रिका आणि धोकादायक प्रवास
सुरक्षितता आणि रोजगाराच्या शोधात ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ भागातून हजारो स्थलांतरित नागरिक दरवर्षी जिबूतीमार्गे बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी पार करून आखाती देशांकडे जाण्याचा प्रयत्न करतात. येमेनमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या छायेतही आर्थिक अडचणींमुळे नागरिकांची ही जीवघेणी स्थलांतर प्रक्रिया सुरूच राहते. जिबूतीमधील IOM चे मिशन प्रमुख अलेक्झांडर कोयसॅक यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करताना म्हटले की, ही जीवितहानी अत्यंत धक्कादायक असून, चांगल्या भविष्यासाठी धोकादायक मार्गाने प्रवास करणाऱ्या स्थलांतरितांना कोणत्या गंभीर संकटांना सामोरे जावे लागते, याचे हे भीषण वास्तव आहे.

बेपत्ता नागरिकांचा शोध सुरूच
सध्या स्थानिक प्रशासन आणि आयओएमच्या संयुक्त विद्यमाने बेपत्ता नागरिकांचा कसून शोध घेतला जात आहे. मात्र, समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे बचावकार्यात काही अडचणी येत आहेत. या घटनेमुळे आफ्रिकेतील बेकायदेशीर आणि धोकादायक प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर एरणीवर आला आहे.

हेही वाचा – अमेरिकेला इराणकडून मोठा दणका! होर्मुज खाडीतील स्फोटात 20 लाख बॅरल्स तेलवाहू जहाज भस्मसात; जागतिक तेलाचा पुरवठा धोक्यात

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number