Donald Trump On War: ‘कामगिरीला 10 पैकी 15 गुण’; मध्यपूर्वेतील युद्धजन्य स्थितीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे खळबळजनक विधान, अमेरिकन सैन्याच्या कारवाईचे तोंडभरून कौतुक

अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त मोहिमेमुळे इराणच्या क्षेपणास्त्र साठ्यावर मोठा दबाव निर्माण झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

Donald Trump On War: ‘कामगिरीला 10 पैकी 15 गुण’; मध्यपूर्वेतील युद्धजन्य स्थितीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे खळबळजनक विधान, अमेरिकन सैन्याच्या कारवाईचे तोंडभरून कौतुक

वॉशिंग्टन: मध्यपूर्वेत उसळलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याच्या कारवाईला अत्यंत उच्च दर्जा देत युद्धातील प्रगतीबाबत आत्मविश्वासपूर्ण विधान केले आहे. बुधवारी व्हाईट हाऊस येथे तंत्रज्ञान क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, इराणविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत अमेरिका आणि सहयोगी देश स्पष्टपणे वरचढ ठरत आहेत. “कोणी मला विचारलं की या मोहिमेला 10 पैकी किती गुण द्याल? तर मी सांगेल, किमान 15,” असे म्हणत त्यांनी अमेरिकन सैन्याच्या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले.

ट्रम्प यांनी सांगितले की, युद्धाच्या रणांगणावर अमेरिका सध्या अत्यंत मजबूत स्थितीत आहे आणि इराणमधील नेतृत्वावर मोठा दबाव निर्माण होत आहे. “जो कोणी नेता होण्याचा प्रयत्न करतो, त्याचा शेवट मृत्यूमध्ये होतो,” असे सूचक विधान करत त्यांनी इराणच्या नेतृत्वातील अस्थिरतेकडे लक्ष वेधले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मध्यपूर्वेतील राजकीय आणि लष्करी परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, हे युद्ध आता पाचव्या दिवशी प्रवेशले असून मध्यपूर्वेतील अनेक भागांमध्ये स्फोटांच्या घटना आणि लष्करी हालचाली सुरूच आहेत. अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तरीत्या केलेल्या समन्वित कारवायांमुळे इराणच्या लष्करी तळांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. या कारवाईत क्षेपणास्त्र तळ, लष्करी पायाभूत सुविधा आणि नौदलाशी संबंधित साधनांवर लक्ष्य साधण्यात आले असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सांगितले आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: मार्चमध्येच कडक उन्हाचा कहर; मुंबईसह कोकणात उष्णतेचा तडाखा; पुढील तीन दिवस…

या संघर्षातील एक मोठी आणि नाट्यमय घटना म्हणजे अमेरिकन पाणबुडीने (US Submarine) श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणची एक युद्धनौक बुडवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सागरी लढाईत मोठी वाढ झाल्याचे मानले जात आहे. नौदलाच्या या कारवाईमुळे इराणच्या सागरी संरक्षण क्षमतेला मोठा धक्का बसल्याचे लष्करी विश्लेषकांचे मत आहे.

ट्रम्प यांनी यावेळी इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावरही तीव्र टीका केली. त्यांनी सांगितले की, इराणच्या बॅलिस्टिक मिसाइल शस्त्रसाठ्यावर जलद गतीने हल्ले केले जात असून तो जवळजवळ नष्ट करण्याच्या मार्गावर आहे. “इराणची सर्वात महत्त्वाची शस्त्र प्रणाली म्हणजे बॅलिस्टिक मिसाइल साठा, आणि तो आम्ही वेगाने संपवत आहोत,” असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

इराणवर कारवाई करण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना ट्रम्प यांनी आण्विक शस्त्रांच्या धोक्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. “जेव्हा वेडे लोक अण्वस्त्रे मिळवतात, तेव्हा जगासाठी गंभीर परिणाम होतात,” असे ते म्हणाले. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे सुरू केलेल्या हवाई हल्ल्यांची मोहीम पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, युद्धानंतरच्या परिस्थितीबाबत अमेरिकेकडे अद्याप स्पष्ट योजना नसल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ‘नवीन युद्धे सुरू करणार नाही’ असे आश्वासन देणाऱ्या ट्रम्प यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी मात्र सांगितले की, लष्करी मोहीम संपल्यानंतर इराणमध्ये अमेरिकेची संभाव्य भूमिका काय असू शकते याचा राष्ट्राध्यक्ष सध्या गंभीरपणे विचार करत आहेत.

हेही वाचा: Middle East War: इराण हादरले! कार्यभार स्वीकारताच संरक्षणमंत्र्यांचा 'गेम ओव्हर'; इस्रायलचा थरकाप उडवणारा प्रहार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number