Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्या वादग्रस्त निर्णयांमुळे आणि वागणुकीमुळे पुन्हा एकदा जागतिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. मिशिगनमधील डियरबॉर्न येथील ‘फोर्ड’ (Ford) कंपनीच्या मोठ्या ट्रक प्लांटला भेट दिली असता, एका धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे. ट्रम्प कारखान्याची पाहणी करत असताना तेथील एका कामगाराने त्यांना थेट ‘पेडोफाइल प्रोटेक्टर’ (Pedophile Protector – लहान मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना वाचवणारा) म्हणून ओरडून हिणवले. हे ऐकताच ट्रम्प यांचा संयम सुटला आणि त्यांनी भर कॅमेऱ्यासमोर त्या कामगाराला उद्देशून अश्लील हाताने इशारा (Middle Finger) केला आणि ‘F*** You’ म्हणत शिवीगाळही केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अमेरिकेसह जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.
व्हाईट हाऊसचा बचाव: ‘तो’ कामगार वेडा होता!
या प्रकरणावर टीकेची झोड उठल्यानंतर व्हाईट हाऊसने (White House) तातडीने स्पष्टीकरण जारी केले आहे. व्हाईट हाऊसचे संवाद संचालक स्टीव्हन चेउंग यांनी सांगितले की, “एक वेडा व्यक्ती तिथे उभा राहून रागाच्या भरात राष्ट्राध्यक्षांना अपशब्द बोलत होता, त्याला ट्रम्प यांनी दिलेले ते चोख आणि स्पष्ट उत्तर होते.” फोर्ड कंपनीनेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून, आपल्या आवारात अशा प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट करत संबंधित कामगाराला निलंबित केले असल्याची माहिती दिली आहे.
हेही वाचा – Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प आता व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष? सोशल मीडिया पोस्टमुळे जगभरात खळबळ
इराणवर 25 टक्के टॅरिफ आणि युद्धाची धमकी
दुसरीकडे, ट्रम्प यांच्या आर्थिक आणि लष्करी धोरणांमुळे जग सध्या युद्धाच्या छायेत आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या लोकशाहीवादी आंदोलनाला पाठिंबा देताना ट्रम्प यांनी इराण सरकारला थेट लष्करी हल्ल्याची धमकी दिली आहे. “इराणचा लढा शेवटच्या टप्प्यात आहे,” असे म्हणत त्यांनी इराणसोबत व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशावर 25% इतका प्रचंड ‘टॅरिफ’ (Tariff) लागू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा फटका चीन, भारत आणि तुर्की यांसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांना बसण्याची शक्यता असून, यामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे.
US President Donald Trump gave the middle finger after he was heckled during a tour of a car manufacturing plant in Michigan. It's been reported the heckler called President Trump a “pedophile protector”. #donaldtrump #unitedstates pic.twitter.com/nF0ISFYNmJ — The Advertiser (@theTiser) January 14, 2026
इराणचे प्रत्युत्तर आणि जागतिक चिंता
इराण सरकारने मात्र अमेरिकेचा हा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला आहे. इराणमध्ये सध्या सरकारविरोधी आंदोलने सुरू असून तिथे मोठी जीवितहानी होत आहे, मात्र ट्रम्प यांनी थेट ‘टॅरिफ वॉर’ पुकारल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. भारतासारख्या मित्रदेशांसाठीही इराणशी व्यापार करणे आता आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरणार आहे. ट्रम्प यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे आणि कारखान्यातील वादग्रस्त वागणुकीमुळे अमेरिकेची जागतिक प्रतिमा धोक्यात आल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.