Donald Trump: ‘इराणला पुन्हा उभं राहायला 20 वर्षे लागतील’; अण्वस्त्रांच्या मुद्द्यावरून अमेरिकेची इराणला मोठी तंबी

इस्लामाबादमध्ये पुन्हा अमेरिका-इराण चर्चा होण्याची शक्यता असून, अणुकार्यक्रम, युरेनियम संवर्धन आणि निर्बंध हटवण्याच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये अद्याप मतभेद कायम आहेत.

Donald Trump: ‘इराणला पुन्हा उभं राहायला 20 वर्षे लागतील’; अण्वस्त्रांच्या मुद्द्यावरून अमेरिकेची इराणला मोठी तंबी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धचे युद्ध आता संपण्याच्या मार्गावर असल्याचा दावा केला आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, “हे युद्ध आता जवळपास संपले आहे. जर आम्ही आत्ता थांबलो, तरी इराणला पुन्हा उभे राहण्यासाठी 20 वर्षे लागतील.” त्यांनी पुढे असेही म्हटले की, इराणला आता करार करायचा आहे आणि ते “अत्यंत आतुरतेने” चर्चेसाठी तयार आहेत.

ट्रम्प यांनी इराणच्या अणुकार्यक्रमावरही कठोर भूमिका घेतली. त्यांच्या मते, जर इराणकडे अण्वस्त्र असते, तर संपूर्ण पश्चिम आशियातील परिस्थिती बदलली असती. “इराणकडे अण्वस्त्र असते, तर ते प्रत्येकाला ‘सर’ म्हणायला भाग पाडले असते,” असेही ट्रम्प यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेची कारवाई अद्याप संपलेली नाही आणि पुढील काही दिवसांत परिस्थितीनुसार आणखी निर्णय घेतले जाऊ शकतात.

हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा चर्चेची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या राजधानीत झालेल्या चर्चेत कोणताही ठोस निकाल लागला नव्हता. मात्र दोन्ही देशांनी संवादाचे दार उघडे ठेवले असून, या आठवड्यात पुन्हा एक फेरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: PM Narendra Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन! तब्बल 40 मिनिटांच्या संभाषणात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा; लवकरच होऊ शकते मोठी घोषणा

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वॅन्स यांनीही सांगितले की, ट्रम्प इराणसोबत “मोठा आणि दीर्घकालीन करार” करू इच्छितात. मात्र दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून अविश्वास असल्याने ही प्रक्रिया सोपी नाही. “हा प्रश्न एका रात्रीत सुटणार नाही,” असे वॅन्स म्हणाले.

या चर्चेतील सर्वात मोठा वादाचा मुद्दा इराणचा अणुकार्यक्रम ठरला आहे. अमेरिकेने इराणने 20 वर्षांसाठी युरेनियम संवर्धन आणि अणुसंबंधित सर्व हालचाली थांबवाव्यात, अशी मागणी केली आहे.

त्याउलट इराणने तीन ते पाच वर्षांच्या मर्यादित स्थगितीचा प्रस्ताव दिला आहे. अमेरिकेने इराणने समृद्ध युरेनियमचा साठाही हटवावा, अशी अट घातली आहे. मात्र इराणने आंतरराष्ट्रीय निर्बंध हटवण्याची मागणी केली असून, त्यावर अजूनही सहमती झालेली नाही. 

हेही वाचा: Israel Iran War Update: इस्त्रायल-हिजबुल्लाह युद्धात 'बिंत जबील' ठरतंय रणांगण; दक्षिण लेबनानमध्ये आमनेसामने लढाई, शहराला लष्करी वेढा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number