Donald Trump : ‘इराणच्या सहकार्याने किंवा त्यांच्याशिवाय होर्मूज तर उघडणारच’; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा निर्वाणीचा इशारा, दोन आठवड्यांचा युद्धविराम धोक्यात?

इराण या मार्गावरून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांकडून प्रति बॅरल 1 डॉलर टोल (शुल्क) वसूल करण्याची योजना आखत आहे. मात्र, यावरूनही ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांत सुनावले आहे.

Donald Trump : ‘इराणच्या सहकार्याने किंवा त्यांच्याशिवाय होर्मूज तर उघडणारच’; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा निर्वाणीचा इशारा, दोन आठवड्यांचा युद्धविराम धोक्यात?

Donald Trump warns Iran to Open Strait of Hormuz : जागतिक पुरवठा साखळीचा कणा मानली जाणारी 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) खुली करण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात 2 आठवड्यांचा युद्धविराम घोषित झाला असला, तरी इस्रायल-लेबनॉन संघर्षामुळे ही सामुद्रधुनी अद्यापही बंदच आहे. मेरीलँडमधील 'जॉइंट बेस अँड्र्यूज' येथे पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराणने सहकार्य केले तर उत्तम, अन्यथा त्यांच्या मदतीशिवाय वॉशिंग्टन स्वतः ही सामुद्रधुनी लवकरच खुली करेल. हे पाऊल उचलणे सोपे नसेल याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

इराणचा 'टोल' वसुलीचा मनसुबा धुळीस मिळवणार
इराण या मार्गावरून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांकडून प्रति बॅरल 1 डॉलर टोल (शुल्क) वसूल करण्याची योजना आखत आहे. एका वृत्तानुसार, यावरही प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांत सुनावले आहे. 'हे आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र आहे आणि अमेरिका इराणला असा कोणताही टोल वसूल करू देणार नाही,' असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले. विशेष म्हणजे, या सामुद्रधुनीवर नियंत्रण राखणाऱ्या ओमान देशाने अशा कोणत्याही टोल योजनेचा इन्कार केला आहे. जागतिक तेल आणि लिक्विफाइड नॅशनल गॅस (LNG) वाहतुकीचा सुमारे 20 टक्के भाग याच मार्गावरून जातो, त्यामुळे यावर कोणा एका देशाची मक्तेदारी अमेरिका सहन करणार नाही, असे संकेत मिळाले आहेत.

नाटो (NATO) देशांवर ट्रम्प यांची नाराजी
होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित ठेवण्यासाठी नाटो मित्रदेशांकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याबद्दल ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाटोचे सरचिटणीस मार्क रट्टे यांनी युरोपीय सरकारांना असा संदेश दिला आहे की, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना येत्या काही दिवसांत या सामुद्रधुनीच्या सुरक्षेसाठी ठोस आणि लेखी वचनबद्धता हवी आहे. ट्रम्प यांनी सुचवले आहे की, केवळ अमेरिकाच नाही तर इतर अनेक देश या मार्गाचा वापर करतात, त्यामुळे त्यांनीही मदतीसाठी पुढे यायला हवे.

हेही वाचा – Islamabad Talks: 'जोपर्यंत दोन अटी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत चेहरादेखील…', युद्धविरामाबाबत इस्लामाबादेत चर्चा, पण इराण मतावर ठाम

युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम
फेब्रुवारी 2026 मध्ये अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या या युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यात इतिहासातील सर्वात मोठे व्यत्यय आले आहेत. इराणने प्रत्युत्तर म्हणून आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर हल्ले केले होते. या संघर्षांमुळे तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असून जागतिक बाजारपेठ हादरली आहे. जरी मंगळवारी इराणसोबत 14 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा झाली असली, तरी इस्रायलकडून लेबनॉनवर होणाऱ्या बॉम्बहल्ल्यांमुळे हा करार कोणत्याही क्षणी मोडण्याची भीती निर्माण झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची पुढील रणनीती
ट्रम्प यांनी अद्याप आपल्या लष्करी योजनेवर सविस्तर भाष्य केलेले नाही, मात्र "इतर देश मदतीसाठी पुढे येत आहेत," असे सूचक विधान त्यांनी केले आहे. इराणने जर ही सामुद्रधुनी रोखून धरली, तर इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याची धमकी अमेरिकेने यापूर्वीच दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अमेरिकन नौदल या भागात मोठी कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जागतिक अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणे हे आता अमेरिकेसाठी प्रतिष्ठेचे बनले आहे.

हेही वाचा – MQ-4C Triton : 1600 कोटींचा फटका! होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून उडणारं अमेरिकन ड्रोन रडारवरून गायब; इराणच्या दिशेने वळताच आकाशात काय घडलं?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number