Wednesday, November 19, 2025 01:22:20 PM

Nobel Peace Prize 2025: डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वप्नांचा चुराडा! 'या' महिलेला मिळाला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल पुरस्कार मिळवण्याचे स्पप्न भंगले आहे. नोबेल समिती नेहमीच दीर्घकाळ शांततेसाठी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना हा पुरस्कार देते.

nobel peace prize 2025 डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वप्नांचा चुराडा या महिलेला मिळाला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार
Maria Corina Machado

Nobel Peace Prize 2025: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल पुरस्कार मिळवण्याचे स्पप्न भंगले आहे. कारण, जगातील सर्वात प्रतिष्ठित नोबेल शांतता पुरस्कार 2025 मारिया कोरिना मचाडो यांना देण्यात आला आहे. नोबेल समिती नेहमीच दीर्घकाळ शांततेसाठी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना हा पुरस्कार देते.

कोण आहेत मारिया कोरिना मचाडो ?

मारिया कोरिना मचाडोचा जन्म 7 ऑक्टोबर 1967  रोजी व्हेनेझुएलात झाला. त्या विरोधी नेत्या असून औद्योगिक अभियंता आहेत. 2002 मध्ये त्यांनी सुमाते मतदान देखरेख गटाची स्थापना केली. 2011 ते 2014 दरम्यान त्या व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय सभेच्या सदस्य म्हणून काम करत होत्या. 2018 मध्ये बीबीसीच्या 100 सर्वात प्रभावशाली महिला यादीत आणि 2025 मध्ये टाइम मासिकाच्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्ती यादीत त्यांचा समावेश झाला. निकोलस मादुरो सरकारने त्यांना देश सोडण्यास बंदी घातली होती.

हेही वाचा - Donald Trump : टॅरिफ, H-1B व्हिसानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला आणखी एक मोठा धक्का; थेट लाखो भारतीयांवर संकट!

नोबेल पुरस्कारासाठी 'या' संस्थांच्या नावांची चर्चा  

या वर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी अनेक नावांचा विचार केला जात होता. पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ओस्लोने काही संभाव्य विजेत्यांचा उल्लेख केला आहे, ज्यात सुदानचे आपत्कालीन प्रतिसाद कक्ष, आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय, कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट्स या संस्थांचा समावेश होता. 

हेही वाचा - India to Open Embassy in Kabul: तालिबानबाबत नवी दिल्लीचा मोठा निर्णय! भारत काबूलमध्ये दूतावास उघडणार

मागील वर्षी कोणाला मिळाले शांततेचे नोबेल? 

दरम्यान, 2024 चा नोबेल शांतता पुरस्कार जपानी संघटना निहोन हिडानक्यो ला देण्यात आला होता. ही संघटना अण्वस्त्रांविरुद्ध अनेक दशकांपासून काम करत आहे. या संघटनेने हिरोशिमा-नागासाकी बॉम्बस्फोटातील बळींचा आवाज जागतिक पातळीवर पोहोचवला. नोबेल शांतता पुरस्कार हा जगातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक मानला जातो. इतर नोबेल पारितोषिकांची घोषणा स्टॉकहोममध्ये केली जाते, पण शांतता पुरस्काराची घोषणा आणि समारंभ ओस्लोमध्ये आयोजित केला जातो. तथापी, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक सोमवारी जाहीर होणार आहे. 


सम्बन्धित सामग्री