Monday, February 17, 2025 01:09:18 PM

India Restrict Use Chatgpt Deepseek AI
DeepSeek AI आणि ChatGPT वापरू नका; अर्थ मंत्रालयाने कर्मचाऱ्यांना असा इशारा का दिला? वाचा सविस्तर

सरकारी कागदपत्रे आणि डेटा गोपनीयतेला धोका असल्याचे सांगून, सरकारने म्हटले आहे की, सर्व सरकारी विभागांनी ऑफिसशी संबंधित कामांसाठी चॅटजीपीटी आणि डीपसीकसह इतर एआय सॉफ्टवेअर वापरणे टाळावे.

deepseek ai आणि chatgpt वापरू नका अर्थ मंत्रालयाने कर्मचाऱ्यांना असा इशारा का दिला वाचा सविस्तर
India Restrict Use Chatgpt and Deepseek AI
Edited Image

AI Restrictions India: डीपसीक एआय (DeepSeek AI) वरील गोपनीयतेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लाँच झाल्यानंतर अनेक देशांमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली आहे. आता अलिकडेच, भारत सरकारने चॅटजीपीटी (ChatGPT) आणि डीपसीक सारख्या एआय प्लॅटफॉर्मबाबत एक इशारा जारी केला आहे. अर्थ मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांना एआय टूल्स (AI Tools) वापरू नयेत असा इशारा दिला आहे. सरकारी कागदपत्रे आणि डेटा गोपनीयतेला धोका असल्याचे सांगून, सरकारने म्हटले आहे की, सर्व सरकारी विभागांनी ऑफिसशी संबंधित कामांसाठी चॅटजीपीटी आणि डीपसीकसह इतर एआय सॉफ्टवेअर वापरणे टाळावे. 

भारतीय अर्थ मंत्रालयाचे सहसचिव प्रदीप कुमार सिंग यांनी 29 जानेवारी रोजीच यासंदर्भात सूचना जारी केली होती. याअंतर्गत, ऑफिस संगणक आणि उपकरणांमध्ये एआय टूल्स आणि एआय अॅप्स (जसे की चॅटजीपीटी, डीपसीक) वापरल्या जाणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला. हा आदेश वित्त सचिवांच्या मान्यतेनंतर जारी करण्यात आला असून तो महसूल, आर्थिक व्यवहार, खर्च, सार्वजनिक उपक्रम, DIPAM आणि वित्तीय सेवा यासारख्या सर्व आवश्यक विभागांना पाठवण्यात आला आहे.

सरकारी कागदपत्रे आणि डेटा गोपनीयतेला धोका - 

अर्थमंत्रालयाने म्हटलं आहे की, चॅटजीपीटी आणि डीपसीकसह इतर एआय टूल्सच्या वापरामुळे सरकारच्या गोपनीय कागदपत्रांना आणि डेटाला धोका निर्माण होऊ शकतो. ऑस्ट्रेलिया आणि इटली सारख्या देशांनी डेटा गोपनीयतेच्या धोक्यांचा हवाला देत डीपसीक एआयच्या वापरावर बंदी घातली आहे. भाषांतर, सारांश निर्मिती आणि प्रतिमा निर्मिती यासारख्या अनेक गोष्टी एआय द्वारे केल्या जाऊ शकतात. यामुळे, त्यांचा वापर सरकारी कार्यालयांमध्येही होऊ लागला आहे. 

हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी कारवाई! अमेरिकेतून 104 हद्दपार केलेल्या भारतीयांना घेऊन जाणारे विमान अमृतसरमध्ये दाखल

Open AI चे CEO भारत दौऱ्यावर येणार - 

दरम्यान, ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन भारतात येण्यापूर्वी अर्थमंत्रालयाने हा इशारा दिला आहे. भारतात, ऑल्टमन आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑल्टमन फायरसाइड चॅटमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच ते उच्च सरकारी अधिकाऱ्यांची देखील भेट घेणार आहेत. 

हेही वाचा - अमेरिका करणार 'गाझा'वर कब्जा: डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

डीपसीक एआय म्हणजे काय?

डीपसीक हे त्याच नावाच्या हांग्झो येथील संशोधन प्रयोगशाळेने विकसित केलेले एक प्रगत एआय मॉडेल आहे. त्याची स्थापना 2023 मध्ये एआय आणि क्वांटिटेटिव्ह फायनान्सची पार्श्वभूमी असलेले अभियंता लिआंग वेनफेंग यांनी केली होती. डीपसीक-व्ही3 मॉडेल ही एक प्रगत ओपन-सोर्स एआय सिस्टम आहे. या अॅपने ओपनएआयच्या चॅटजीपीटीला मागे टाकले आहे. या अ‍ॅपचे यश अमेरिका, ब्रिटन आणि चीनसह अनेक देशांमध्ये दिसून आले.
 


सम्बन्धित सामग्री