एलोन मस्कची आई मेय मस्कने पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं उत्तर; 70 व्या वर्षीही करते मॉडेलिंग

पंतप्रधान मोदींच्या ट्विटनंतर, एलोन मस्कची आई मेय मस्क यांनी पंतप्रधान मोदींच्या ट्विटला उत्तर दिले.

एलोन मस्कची आई मेय मस्कने पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं उत्तर; 70 व्या वर्षीही करते मॉडेलिंग
Edited Image

टेस्लाचे प्रमुख आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क हे दररोज कोणत्या ना कोणत्या विषयामुळे चर्चेत असतात. एलोन मस्क यांनी अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट केले की, ते या वर्षाच्या अखेरीस भारताला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदींनीही ट्विट करून याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ‘मी एलोन मस्कशी बोललो आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली, ज्यात या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या आमच्या बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांचा समावेश आहे,’ असं मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

एलोन मस्कच्या आईने पंतप्रधान मोदींनाच्या ट्विटला दिलं उत्तर – 

पंतप्रधान मोदींच्या ट्विटनंतर, एलोन मस्कची आई मेय मस्क यांनी पंतप्रधान मोदींच्या ट्विटला उत्तर दिले. मेय मस्कने तिच्या पोस्टमध्ये काहीही लिहिले नसले तरी तिने दोन इमोजी वापरून पंतप्रधानांना उत्तर दिले. तिने एक तिरंग्याची इमोजी आणि दुसरा आनंदी चेहरा असणारी इमोजी शेअर केली. मेय मस्क यांनी ट्विट केलेले हे इमोजी त्यांचे भारतावरील प्रेम दर्शवते.

हेही वाचा –  Hurun Global Rich List: मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीतून बाहेर! एकूण संपत्तीत झाली ”इतकी” घट

एलोन मस्क यांची आई मे मस्क करते मॉडेलिंग – 

मेय मस्क 70 वर्षांच्या असून व्यवसायाने मॉडेल आहेत. 70 वर्षांच्या वयातही, मेय मस्क खूप सुंदर दिसते आणि ती अजूनही मॉडेलिंग करत आहे. ती भारतात आणि परदेशात प्रेरक वक्ता म्हणून व्याख्याने देखील देते. मे मस्कने वयाच्या 15 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. फॅशन इंडस्ट्रीमध्ये मे मस्क यांचे नाव खूप प्रसिद्ध आहे. मेय मस्कचा तिचा पती आणि एलोन मस्कचे वडील एरोल यांच्यापासून घटस्फोट झाला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number