Modi-Putin Phone Call: ‘खोटे आणि निराधार…’; मोदी-पुतिन चर्चेवर नाटो प्रमुखांचा दावा भारताने फेटाळला

परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या कोणत्याही चर्चा झालेल्या नाहीत. नाटो प्रमुखांचे विधान तथ्यांपासून दूर, दिशाभूल करणारे आणि पूर्णपणे निराधार आहे.

Modi-Putin Phone Call: ‘खोटे आणि निराधार…’; मोदी-पुतिन चर्चेवर नाटो प्रमुखांचा दावा भारताने फेटाळला

Modi-Putin Phone Call: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्याची महत्त्वाकांक्षा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांनी दावा केला की, ट्रम्प यांनी भारतावर रशियन तेल खरेदीसाठी लादलेल्या शुल्काचा परिणाम म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात युक्रेन युद्धाबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे. 

रुटे यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत म्हटलं की, ट्रम्प यांचे कर धोरण मॉस्कोवर गंभीर परिणाम करत आहे. त्यामुळे मोदींनी पुतिन यांच्याशी फोनवर संवाद साधून युक्रेन संकटाबाबत स्पष्टीकरण मागितले. त्यांनी हेही सूचित केले की, ट्रम्प यांचे हे पाऊल शांततेकडे नेणारा टप्पा ठरू शकतो. तथापी, भारताने हा दावा ठामपणे फेटाळला आहे. 

हेही वाचा – Earthquake in US: अमेरिकेतील ओरेगॉन किनारा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला! 'इतकी' होती तीव्रता

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत स्पष्ट केले की, 'अशा प्रकारच्या कोणत्याही चर्चा झालेल्या नाहीत. नाटो प्रमुखांचे विधान तथ्यांपासून दूर, दिशाभूल करणारे आणि पूर्णपणे निराधार आहे.' मंत्रालयाने पुढे इशारा देत म्हटले की, भविष्यात अशा वक्तव्यांबाबत नाटो नेतृत्वाने सावधगिरी बाळगावी.

हेही वाचा – Microsoft Blocks Israeli Miletary : मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय ; इस्रायली सैन्याच्या Cloud आणि AI सेवांवर आळा

विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांनी नुकतीच 17 सप्टेंबर रोजी मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फोनवर चर्चा केली होती. त्यात मोदींनी पुन्हा एकदा युद्ध शांततेच्या मार्गाने संपवण्याचे आवाहन केले होते. तथापी, ट्रम्प यांनी अलीकडेच नाटो देशांना चीनवर 50-100 टक्के शुल्क लावण्याची आणि रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याची सूचना केली होती. राजकीय विश्लेषकांच्या मते, ट्रम्प यांचे हे प्रयत्न त्यांची जागतिक प्रतिमा वाढवून नोबेल पुरस्काराच्या दाव्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी असू शकतात.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number