Ukraine Cargo Ship Attack : युक्रेनमध्ये व्यापारी जहाजावर रशियन क्षेपणास्त्रांचा भीषण हल्ला; 4 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू

युक्रेनच्या ओडेसा बंदरातून मोठी बातमी समोर आली आहे. युक्रेनच्या ओडेसा बंदरातून बाहेर पडणाऱ्या 'एमव्ही गोल्डन लिओ' या व्यापारी मालवाहू जहाजावर रशियन क्षेपणास्त्राचा भीषण हल्ला झाला आहे.

Ukraine Cargo Ship Attack : युक्रेनमध्ये व्यापारी जहाजावर रशियन क्षेपणास्त्रांचा भीषण हल्ला; 4 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू

युक्रेनच्या ओडेसा बंदरातून मोठी बातमी समोर आली आहे. युक्रेनच्या ओडेसा बंदरातून बाहेर पडणाऱ्या 'एमव्ही गोल्डन लिओ' या व्यापारी मालवाहू जहाजावर रशियन क्षेपणास्त्राचा भीषण हल्ला झाला आहे. या हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा मृत्यू झाला असून एक भारतीय गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. भारत सरकारने मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत जखमीच्या प्रकृती सुधारणेसाठी प्रार्थना केली आहे. 

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 19 जुलै 2026 रोजी सायंकाळी ओडेसा बंदरातून निघत असताना एमव्ही गोल्डन लिओ या मालवाहू जहाजावर हा हल्ला झाला. यावेळी जहाजात एकूण 17 क्रू मेंबर्स होते, यात 5 भारतीय नागरिक देखील होते. या दुर्दैवी घटनेत 4 भारतीयांचा मृत्यू झाला, तर एक भारतीय गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- US Iran Conflict: इराणविरोधात अमेरिकेची मोठी युद्धनीती; 'या' महत्त्वाच्या ठिकाणावरून महाविनाशक हवाई हल्ल्यांची तयारी सुरू

सध्या युक्रेनमधील भारतीय दूतावास संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, प्रभावित भारतीयांना सर्वतोपरी मदत केली जात असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. तसेच व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे आणि निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात घालणे अत्यंत निंदनीय असल्याची भावना भारताने व्यक्त केली आहे.

यावर युक्रेनने या हल्ल्यासाठी रशियाला पूर्णपणे जबाबदार ठरवले आहे. रशियाने युक्रेनच्या समुद्री मार्गावरून प्रवास करणाऱ्या गिनी-बिसाऊचा ध्वज असलेल्या 'गोल्डन लिओ' या नागरी मालवाहू जहाजावर तीन क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या जहाजावर भारत आणि सिरियाचे नागरिक होते. क्षेपणास्त्र धडकल्यामुळे जहाजाला भीषण आग लागली. ज्यात युक्रेनचा एक मरीन पायलट आणि चार भारतीय कर्मचारी ठार झाले आहेत. या घटनेनंतर रशियाविरोधात कठोर आंतरराष्ट्रीय कारवाई आणि नव्या निर्बंधांची मागणी करणार असल्याचेही युक्रेनने म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number