Ebola Case : फ्रान्समध्ये इबोलाचा पहिला रुग्ण, डीआरसी काँगोतून परतलेल्या एका डॉक्टराला लागण; आरोग यंत्रणा सतर्क

फ्रान्सच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील (डीआरसी) मानवतावादी मोहिमेवरून परतलेल्या एका डॉक्टराची 'इबोला' चाचणी पॉझिटिव्ह आल्याने, सध्याच्या उद्रेकादरम्यान फ्रान्समध्ये इबोलाचा पहिला रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी जारी केलेल्या एका निवेदनात फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, संबंधित आरोग्य कर्मचारी ज्या भागात विषाणूचा प्रसार होत होता. त्यापैकीच एका भागात कार्यरत होते. "रुग्णावर एका प्रमुख आरोग्य केंद्रात, […]

Ebola Case : फ्रान्समध्ये इबोलाचा पहिला रुग्ण, डीआरसी काँगोतून परतलेल्या एका डॉक्टराला लागण; आरोग यंत्रणा सतर्क

फ्रान्सच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील (डीआरसी) मानवतावादी मोहिमेवरून परतलेल्या एका डॉक्टराची 'इबोला' चाचणी पॉझिटिव्ह आल्याने, सध्याच्या उद्रेकादरम्यान फ्रान्समध्ये इबोलाचा पहिला रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी जारी केलेल्या एका निवेदनात फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, संबंधित आरोग्य कर्मचारी ज्या भागात विषाणूचा प्रसार होत होता. त्यापैकीच एका भागात कार्यरत होते. "रुग्णावर एका प्रमुख आरोग्य केंद्रात, जैव-सुरक्षेच्या कठोर नियमांचे पालन करून उपचार केले जात आहेत," असे मंत्रालयाने सांगितले. "फ्रान्समध्ये आगमन होताच रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यासह सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात आल्या आणि संसर्गाचा कोणताही धोका टाळण्यासाठी त्यांना सुरक्षित परिस्थितीत रुग्णालयात हलवण्यात आले," असेही त्यात नमूद करण्यात आले. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी महामारीविषयक तपास (epidemiological investigation) सुरू आहे. आरोग्य यंत्रणेकडून या व्यक्तींशी संपर्क साधला जाईल. तसेच त्यांना 21 दिवस स्वतःला विलगीकरणात (self-isolate) ठेवण्यास सांगितले जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा : Ketan Agrawal Death Case: केतनला लोहगडावरून का ढकललं? सियाचा पोलिसांसमोर गुन्ह्याचा धक्कादायक खुलासा

मे महिन्यापासून, मध्य आफ्रिकेतील डीआरसी (DRC) देशाचा ईशान्येकडील 'इतुरी' प्रांत इबोलाच्या उद्रेकाचे केंद्र बनला आहे. या उद्रेकामुळे आतापर्यंत 260 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, एक हजाराहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. शेजारील युगांडा देशातही याची काही प्रकरणे आढळून आली आहेत. 17 मे रोजी, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या उद्रेकाला "आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी" (public health emergency of international concern) म्हणून घोषित केले. डीआरसीमधील बहुतेक पूर्वीचे इबोलाचे उद्रेक 'इबोला झैरे' नावाच्या विषाणूमुळे झाले होते. परंतु हा उद्रेक 'बुंदीबुग्यो' नावाच्या वेगळ्या प्रकारामुळे झाला आहे. ज्यावर सध्या कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलब्ध नाहीत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number