US Tariff On India: भारतासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेनेरिक औषधांवर टॅरिफ लादण्याची योजना पुढे ढकलली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतीय औषध उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या कमी किमतीच्या औषधांची मोठी निर्यात भारतातून केली जाते. जर टॅरिफ लागू झाले असते, तर भारतीय औषधे महाग होऊन मागणी कमी होऊ शकली असती.
वैद्यकीय डेटा कंपनी IQVIA च्या अहवालानुसार, अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांपैकी सुमारे 47 टक्के औषधं भारतातून येतात. मधुमेह, रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि अँटीबायोटिक्स यांसारखी जीवनरक्षक औषधे भारतीय कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात आयात केली जातात. स्थानिक औषधांपेक्षा हे औषधे अमेरिकेत लक्षणीयरीत्या स्वस्त आहेत. त्यामुळे याचा अमेरिकन नागरिकांना मोठा फायदा होतो.
हेही वाचा - Gaza Israel war Update : ऐतिहासिक क्षण: इस्त्राइल-हमास शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्याला सहमती; ट्रम्प यांची घोषणा
ट्रम्प यांनी यू-टर्न का घेतला?
द वॉल स्ट्रीट जर्नलमधील वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासनाने जेनेरिक औषधांवर कर लादण्याबाबत चौकशी सुरू केली. या चौकशीत केवळ तयार औषधेच नव्हे तर त्यांच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा देखील समावेश होता. तथापि, चौकशीनंतर, वाणिज्य विभागाने व्याप्ती कमी करण्याची शिफारस केली. कारण अनेक तज्ञांचा असा विश्वास होता की जेनेरिक औषधांवर कर लादल्याने अमेरिकेत औषधांच्या किमती वाढतील आणि बाजारपेठेतील तुटवडा निर्माण होऊ शकतो. एका गटाला परदेशी औषधांवर जास्त कर लादून उत्पादन पुन्हा अमेरिकेत आणायचे होते, तर दुसऱ्या गटाला असे वाटले की असे पाऊल अमेरिकन जनतेसाठी हानिकारक ठरेल.
हेही वाचा - UK PM On Aadhaar System : ब्रिटनमध्येही सुरु होणार आधारसारखी डिजिटल ओळख प्रणाली; पंतप्रधान स्टारमरनं दिली माहिती, म्हणाले...
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारत-अमेरिका संबंध ताणले गेले होते. अमेरिकेने आधी चीनवर आयात शुल्क लादले, ज्यामुळे चीनने अमेरिकन कृषी उत्पादनांची खरेदी थांबवली. यामुळे अमेरिकन शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आणि कृषी बाजारपेठेत संकट निर्माण झाले. त्याचप्रमाणे, जर भारतावर औषध शुल्क लादले गेले असते, तर त्याचा अमेरिकन आरोग्य सेवा व्यवस्थेवर परिणाम झाला असता. तथापी, आता ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीय कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.