Thursday, November 13, 2025 02:12:45 PM

Gopichand Hinduja Net Worth: 85व्या वर्षी गोपीचंद हिंदुजांचे निधन! 33 लाख कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण?

अब्जाधीश गोपीचंद हिंदुजा यांचे 85 व्या वर्षी निधन. हिंदुजा समूहाचा जागतिक बिझनेस, अफाट संपत्ती आणि पुढे ही धनदौलत कोणाच्या हाती जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

gopichand hinduja net worth 85व्या वर्षी गोपीचंद हिंदुजांचे निधन 33 लाख कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण

Gopichand Hinduja Net Worth: जागतिक अर्थविश्वात आणि आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात भारतीय वंशाच्या उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर नावलौकिक कमावला आहे. त्यात हिंदुजा समूह हे नाव स्वतंत्र ओळख निर्माण करणारे. या बहुराष्ट्रीय साम्राज्याचे प्रमुख असलेले आणि सतत ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखले जाणारे गोपीचंद हिंदुजा यांचे वयाच्या 82 व्या वर्षी लंडनमधील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ हिंदुजा समूहासाठीच नव्हे तर जागतिक उद्योगविश्वासाठी एक मोठी युगांत घडली, असे मानले जात आहे.

गोपीचंद हिंदुजा हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक होते. गेली जवळपास अनेक दशके त्यांनी हिंदुजा साम्राज्याला जागतिक पातळीवर विस्तार मिळवून दिला. त्यांच्या नेतृत्वखाली समूहाने तेल-ऊर्जा, ऑटोमोबाईल, बँकिंग, केमिकल्स, रिअल इस्टेट, मीडिया अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वतःची मजबूत पकड निर्माण केली. केवळ व्यवसायापुरतेच नव्हे तर अनेक कठीण काळात भारतासाठी मदत करणाऱ्या या कुटुंबाने राष्ट्रीय गरजेच्या वेळी आर्थिक हातभारही लावला.

मे 2023 मध्ये मोठे भाऊ श्रीचंद हिंदुजा यांच्या निधनानंतर गोपीचंद यांनी अधिकृतपणे हिंदुजा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. आणि अलिकडेच संडे टाइम्सच्या श्रीमंतांच्या यादीत हिंदुजा कुटुंब पुन्हा एकदा 'ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंब' म्हणून घोषित झाले. 18 मे 2025 रोजी जाहीर झालेल्या यादीमध्ये हिंदुजा कुटुंबाची एकूण संपत्ती तब्बल 33,67,948 कोटी रुपये असल्याचा उल्लेख आहे. हा आकडा दुसऱ्या क्रमांकावरील कुटुंबापेक्षा तब्बल 8,042 कोटी अधिक आहे. फोर्ब्सच्या रिअलटाइम नेटवर्थनुसारही हिंदुजा कुटुंबाची सामूहिक संपत्ती 20.6 अब्ज म्हणजेच 1,82,668 कोटी एवढी आहे.

हिंदुजा साम्राज्याची पायाभरणी 1914 मध्ये परमानंद हिंदुजा यांनी केली. सुरुवातीला 'ट्रेड कंपनी' म्हणून इराण–भारत मार्गावर माल व्यापार सुरू झाला. पुढे तेल व्यवसायात प्रवेश, मग ऑटोमोबाईल्स, फायनान्स अशा विस्तारानंतर हिंदुजा समूह आज जगभर 38 पेक्षा अधिक देशांत व्यावसायिक उपस्थिती ठेवतो. 1984 मध्ये गल्फ ऑईल आणि 1987 मध्ये अशोक लेलंड खरेदी ही गोपीचंद यांच्या नेतृत्वाखाली झालेली भारतातील एनआरआयद्वारा झालेली पहिली मोठी गुंतवणूक मानली जाते.

कुटुंबातील सदस्य व्यावसायिक जबाबदाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून सांभाळतात गोपीचंद लंडनमध्ये, प्रकाश मोनाकोमध्ये तर अशोक हिंदुजा मुंबईतून भारतीय हितसंबंध सांभाळतात.

लंडनमधील लक्झरी रिअल इस्टेटमध्ये हिंदुजा कुटुंबाची मोठी गुंतवणूक आहे. व्हाइटहॉलमधील ऐतिहासिक ओल्ड वॉर ऑफिस (OWO) इमारतीत असलेले Raffles London Hotel हे त्यांचे प्रमुख प्रकल्पांपैकी एक.


सम्बन्धित सामग्री