India US Defence Deal : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी टॅरिफ लादण्यासारखे अनेक मोठे निर्णय मागील काही दिवसांत घेतले आहेत. अमेरिकेने भारत, चीन, जपान आणि दक्षिण कोरियासह अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादला आहे, ज्याचा फटका भारताला बसत आहे. सध्या भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ (Tariff) लादलेले आहे. तसेच, रशियाकडून तेल आयात (Oil Import) करण्यावरूनही ट्रम्प यांनी भारतावर अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे.
व्यापार कराराआधी 'संरक्षण करार'
मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करार (Trade Deal) होणार असल्याची चर्चा सुरू आहे; मात्र हा करार अद्याप झालेला नाही. पण, त्याआधीच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताने अमेरिकेशी (US) एक मोठा संरक्षण करार (Defence Deal) केला आहे. 24 MH-60R ‘सी हॉक’ (Sea Hawk) हेलिकॉप्टरच्या ताफ्यासाठी तब्बल 946 दशलक्ष डॉलर्सच्या (Million Dollars) करारावर भारताने स्वाक्षरी केली आहे.
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
या संरक्षण करारावर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने (State Department) 'एक्स'वर माहिती दिली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हा करार प्रामुख्याने नौदल विमान वाहतूक देखभाल, सुटे भाग, प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्यावर आधारित असणार आहे. या करारामुळे भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा - Strange Theft : चोराने 17 लाखांचे 60 हिरे आणि 15 नीलम जडवलेले अंडे गिळल्याचा आरोप; कुठे घडला हा चोरीचा अनोखा प्रकार
लॉकहीड मार्टिनने विकसित केलेले हेलिकॉप्टर
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने 'एक्स' (X) वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "भारतासोबतच्या आमच्या संरक्षण संबंधांमध्ये ही एक चांगली बातमी आहे." भारताच्या संरक्षण मंत्रालयाने (India Defence Ministry) लॉकहीड मार्टिनने (Lockheed Martin) (अमेरिकन संरक्षण कंपनी) विकसित केलेल्या 24 MH-60R ‘सी हॉक’ हेलिकॉप्टरसाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार तब्बल 946 दशलक्ष डॉलर्सचा आहे.
दोन्ही राष्ट्रांसाठी सुरक्षितता आणि समृद्धी
या करारामुळे भारतीय नौदलाच्या सागरी क्षमता (Maritime Capabilities) वाढतील आणि अमेरिका तसेच प्रादेशिक भागीदारांसोबत परस्पर कार्यक्षमता निर्माण होईल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने 'एक्स'वरील पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. या करारातून दोन्ही राष्ट्रे अधिक सुरक्षित आणि समृद्ध बनतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा - Imran Khan: 'मला भाजपाशी मैत्री करायची होती, पण…'; इमरान खान यांनी त्यांच्या बहिणीला नेमकं काय सांगितलं?