Wednesday, November 19, 2025 01:07:24 PM

चर्चा तर होणारच! दोघांच्या वयात तब्बल 50 वर्षांचं अंतर; इथे वराला नाही तर वधुला मिळाला 1.8 कोटींचा हुंडा, का? ते वाचा

इंडोनेशियातील एका 74 वर्षीय पुरूष आणि 24 वर्षीय महिलेच्या लग्नाची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अनोख्या लग्नात, वृद्धाने आपल्या वधूला सुमारे 1.8 कोटी रुपयांचा हुंडा दिल्याचा दावा केला

चर्चा तर होणारच दोघांच्या वयात तब्बल 50 वर्षांचं अंतर इथे वराला नाही तर वधुला मिळाला 18 कोटींचा हुंडा  का ते वाचा

नवी दिल्ली: इंडोनेशियातील एका 74 वर्षीय पुरूष आणि 24 वर्षीय महिलेच्या लग्नाची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अनोख्या लग्नात, वृद्धाने आपल्या वधूला सुमारे 1.8 कोटी रुपयांचा हुंडा दिल्याचा दावा केला जात आहे. दोघांच्या वयामध्ये 50 वर्षांचा फरक असल्याने हे लग्न चर्चेचा विषय बनले आहे. हे लग्न 1 ऑक्टोबर रोजी पूर्व जावाच्या पॅसिटान रीजेंसीमध्ये झाले. वराचे नाव टार्मन आणि वधूचे नाव शेला अरिका असल्याचे सांगितले जाते. लग्नादरम्यान, तारमनने सार्वजनिकपणे तीन अब्ज रुपये हुंडा देण्याची घोषणा केली.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, या भव्य समारंभातील पाहुण्यांना पारंपारिक भेटवस्तूंऐवजी 1 लाख रुपये रोख देण्यात आले. सुरुवातीला हुंडा एक अब्ज रुपये असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु लग्नादरम्यान ते अचानक तीन अब्ज रुपये करण्यात आले. मात्र, कार्यक्रमानंतर लग्नाच्या फोटोग्राफी टीमने आरोप केला की, हे जोडपे पैसे न देता गायब झाले आणि त्यांचाशी संपर्क झाला नाही. काही ऑनलाइन वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, वृद्ध वर वधूच्या कुटुंबाची मोटारसायकल घेऊन पळून गेला.

हेही वाचा: Hongkong Flight Accident : हॉंगकॉंगमध्ये मोठा विमान अपघात, दोघांचा मृत्यू, चार जखमी

फोटोग्राफी कंपनीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सोशल मीडियावर खऱ्या हुंड्याच्या रकमेबद्दल आणि चेकच्या सत्यतेबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वर टार्मनने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले. तो म्हणाला, "मी माझ्या पत्नीला सोडलेले नाही. आम्ही अजूनही एकत्र आहोत. 3 अब्ज रुपयांचा हुंडा खरा आहे आणि त्याला बँक ऑफ सेंट्रल एशियाचा पाठिंबा आहे." वधूच्या कुटुंबाने असेही स्पष्ट केले की, हे जोडपे पळून गेले नव्हते, तर हनिमूनला गेले होते.


सम्बन्धित सामग्री