Dumping Crude Oil in Sea: तब्बल 30 लाख बॅरल कच्चं तेल समुद्रात वाहिलं, इराणने असं करण्यामागील नेमकं कारण तरी काय?

इंधन वाहतूक करणारी अनेक जहाज तिथेच अडकून पडली आहेत. अशातच आता इराणला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. 

Dumping Crude Oil in Sea: तब्बल 30 लाख बॅरल कच्चं तेल समुद्रात वाहिलं, इराणने असं करण्यामागील नेमकं कारण तरी काय?

अमेरिका यांच्यातील संघर्ष मोठ्या प्रमाणात पेटला आहे. युद्धानंतर इराणची कोंडी करण्यासाठी अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये नाकेबंदी केली आहे. त्यामुळे इंधन वाहतूक करणारी अनेक जहाज तिथेच अडकून पडली आहेत. अशातच आता इराणला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. 

अमेरिकेने केलेल्या आर्थिक नाकेबंदीमुळे इराणचे कच्चे तेल जागतिक बाजारपेठेत पोहोचू शकत नाही. यामुळे लाखो बॅरल तेल साठवणे कठीण झाले आहे. याचा परिणाम म्हणून हे तेल समुद्रात सोडण्यात आलं आहे.  या तेलाची किंमत दिवसाला तब्बल 2,800 कोटी रुपये इतकी आहे.

इराणची 3 कोटी बॅरल तेल साठवण्याची क्षमता आता पूर्णपणे संपली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, 28 एप्रिल रोजी इराणने आपल्या 'नाशा' नावाच्या 30 वर्षे जुन्या जहाजात 20 लाख बॅरल तेल साठवले होते.

मात्र, आता जहाजांची कमतरता आणि साठवणुकीचे सर्व पर्याय संपल्याने इराणसमोर तेल नष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही असे समोर आले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number