सध्या इराण-इस्रायलच्या युद्धाचा भडका उडाला आहे. यामध्ये आता अमेरिकेनेदेखील उडी घेतली आहे. आता अमेरिका आणि इस्रायल मिळून अमेरिकेवर हल्ले करत आहेत. या हल्ल्यानंतर भीतीचे वातावरण बघायला मिळाले आहे. अमेरिका आणि इराणच्या युद्धाच्या दरम्यानेच अमेरिकेने मोठा अलर्ट जारी केला आहे.
अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने मध्य पूर्वेतील 14 देशांतील आपल्या नागरिकांना तातडीने बाहेर पडण्याचा हाय अलर्ट जारी केला. कोणत्याही मार्गाने लवकारत लवकर हे देश सोडण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
हेही वाचा – Basmati Rice Export : इराण-इस्रायल युद्धामुळे बासमती तांदळाची निर्यात संकटात! 6 लाख टन माल समुद्रात अडकला
यावेळी अमेरिकेने म्हटले की, मध्य पूर्वेतील गंभीर धोक्यामुळे अमेरिकन नागरिकांनी ताबडतोब आणि लवकरात लवकर व्यावसायिक विमानांनी किंवा मिळेल त्या मार्गाने आखाती देशातून बाहेर पडावे. त्यामुळे आता या युद्धाला कोणते स्वरूप प्राप्त होणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, देशातून बाहेर पडण्यासाठी व्यावसायिक विमानांची मदत घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मात्र, ज्या देशांमधून अमेरिकेने आपल्या नागरिकांना बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या देशातील जवळपास विमानतळे बंद आहेत. जसे शक्य आहे, तसे या 14 देशातून बाहेर पडा, असे अमेरिकेने आपल्या नागरिकांना म्हटले. अनेक देशांमध्ये थेट अमेरिकेच्या दूतावासाला टार्गेट करण्यात आले आहे. परिणामी हे युद्ध अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.