Philippines Earthquake: फिलिपिन्स हादरलं! सेबू प्रांतात 6.9 तीव्रतेच्या भूकंपात 69 ठार, 150 हून अधिक जखमी

फिलिपिन्सच्या मध्य भागात 6.9 तीव्रतेच्या भीषण भूकंपाने हाहाकार माजवला आहे. सेबू प्रांतातील बोगो शहराजवळ केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपात 69 जणांचा मृत्यू झाला असून 150 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

Philippines Earthquake: फिलिपिन्स हादरलं! सेबू प्रांतात 6.9 तीव्रतेच्या भूकंपात 69 ठार, 150 हून अधिक जखमी

फिलिपिन्सच्या मध्य भागात मंगळवारी रात्री झालेल्या 6.9 तीव्रतेच्या भीषण भूकंपाने मोठी हानी केली आहे. सेबू प्रांतातील बोगो शहराजवळ केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपात मृतांचा आकडा 69 वर पोहोचला असून 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं या घटनेची पुष्टी केली असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या भूकंपाचा जोर एवढा मोठा होता की बोगो शहरातील रुग्णालये रुग्णांनी गच्च भरली आहेत. अनेक ठिकाणी घरं, इमारती कोसळल्या, तर शंभर वर्षांहून जुने चर्चही पाण्याखाली गेले आहेत. सॅन रेमिजिओ शहरात क्रीडागृह कोसळल्याने बास्केटबॉल खेळणारे काही तरुण मृत्युमुखी पडले.

राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी पीडितांना तातडीच्या मदतीचं आश्वासन दिलं असून कॅबिनेट मंत्री प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मदत कार्य पाहत आहेत. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. दरम्यान, सेबू प्रांतातील सॅन रेमिजिओ शहर आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आलं आहे. तिथल्या उपमहापौरांनी स्थलांतरितांसाठी अन्न, पाणी आणि बचाव कार्यासाठी यंत्रसामग्रीची मागणी केली आहे.

भूकंपानंतर पावसामुळे आणि वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन्स फुटल्याने उत्तरेकडील भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मॅक्टन-सेबू आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत असून बाहेरून मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भूकंपानंतर अनेक धक्के (आफ्टरशॉक्स) नोंदले गेले असून त्यापैकी सर्वात तीव्र धक्का 6 तीव्रतेचा होता. मात्र, या घटने नंतर सुनामीचा धोका नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. फिलिपिन्स पॅसिफिकच्या "रिंग ऑफ फायर" भागात असल्याने येथे भूकंप आणि ज्वालामुखीची क्रियाशीलता नेहमीच तीव्र राहिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number