Thursday, November 13, 2025 07:07:46 AM

भयंकर दुष्काळ! नद्या कोरड्या ठणठणीत, धरणं आटली; या देशातलं पाणी दोन आठवड्यांत संपणार?

गेल्या काही दिवसांत पाण्याची बचत करण्यासाठी अनेक भागांमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. तसेच, पाण्याच्या वापरावर कडक निर्बंध लादले आहेत.

भयंकर दुष्काळ नद्या कोरड्या ठणठणीत धरणं आटली या देशातलं पाणी दोन आठवड्यांत संपणार

Tehran Run Out of Drinking Water in Two weeks : गेल्या पाच वर्षांपासून इराणमध्ये दुष्काळ परिस्थिती आहे, अशी माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. यामुळे देशातील जवळपास 90 टक्के धरणे कोरडी ठणठणीत झाली आहेत. इराणची अर्थव्यवस्था वाढती महागाई आणि चलनातील घसरणीमुळे आधीच कमकुवत झाली असताना, आता या देशासमोर एक मोठे संकट आ वासून उभे राहिले आहे.

इराणमध्ये भीषण दुष्काळ पडल्यामुळे अनेक शहरांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई (Water Scarcity) निर्माण झाली आहे. या देशातील सर्व नद्या पूर्णपणे आटल्या आहेत. प्रमुख धरणेही कोरडी ठणठणीत झाली आहेत. या गंभीर परिस्थितीत, राजधानी तेहरानमधील पिण्याच्या पाण्याचा साठा केवळ दोन आठवड्यांतच संपणार असल्याचा इशारा तेथील माध्यमांनी दिला आहे, ज्यामुळे मोठी चिंता व्यक्त होत आहे.

90 टक्के धरणे कोरडी, पाणीसाठा केवळ 8 टक्के
तेहरान शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमीर कबीर धरणात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख बेहजाद पारसा यांनी सांगितले की, या धरणात आता केवळ 14 दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे, जो त्याच्या एकूण क्षमतेच्या आठ टक्केच आहे. 10 दशलक्षांहून अधिक लोकसंख्या असलेल्या तेहरान शहराला हे धरण केवळ दोन आठवड्यांपर्यंत पिण्याचे पाणी पुरवू शकते, अशी चिंता पारसा यांनी व्यक्त केली. नागरिकांनी पाण्याची बचत न केल्यास तेहरानमधील लोकांना लवकरच गंभीर संकटाचा सामना करावा लागेल.

हेही वाचा - China Flying Cars Trial Production: वाहतुकीच्या नव्या युगाची सुरुवात! चीनने सुरू केलं फ्लाइंग कारचं उत्पादन

विक्रमी दुष्काळ आणि कारणे
तेहरानला पाणीपुरवठा करणाऱ्या अल्बोर्झ पर्वतरांगेतून (Alborz Mountain Range) वाहणाऱ्या नद्यांचा प्रवाह कमी झाला आहे. एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, तेहरान प्रांतात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून, गेल्या 100 वर्षांत अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. त्यांच्या माहितीनुसार, एका वर्षापूर्वी अमीर कबीर धरणात 86 दशलक्ष घनमीटर पाणी होते, परंतु या वर्षी पावसात 100 टक्के घट झाल्यामुळे हे मोठे जलसंकट निर्माण झाले आहे.
शेतीसाठी पाण्याचा वापर: इराणमधील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. धरणातील बहुतांश पाणी शेतीसाठी वापरले जाते, परंतु गेल्या पाच वर्षांपासून वेळेवर पाऊस न पडल्याने शेतकरीही संकटात सापडले आहेत.

सरकारचे फर्मान आणि पुढील वाटचाल
या दुष्काळी परिस्थितीमुळे इराण सरकारने काही दिवसांपूर्वी पाण्याच्या वापराबाबत एक फर्मान जारी केले होते. त्यानुसार, इराणमधील लोकांना दररोज फक्त 130 लिटर पाणी वापरण्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त पाणी वापरल्यास दंड आकारला जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे. इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियन यांनीही पूर्वी देशातील पाण्याचे संकट आज चर्चेत असलेल्या स्थितीपेक्षाही खूप गंभीर आहे, असा इशारा दिला होता. या जलसंकटावर मात करण्यासाठी इराण सरकार कोणकोणत्या उपाययोजना आखणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांत पाण्याची बचत करण्यासाठी अनेक भागांमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे; तर या उन्हाळ्यात वारंवार पाणीपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या आहेत. तेहरानमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाणी व ऊर्जा बचतीसाठी दोन सार्वजनिक सुट्यादेखील जाहीर करण्यात आल्या होत्या. देशातील महागाई आणि दुष्काळी परिस्थितीमुळे ब्लॅक मार्केटमध्ये (इराणच्या महागाईचा निर्देशांक) इराणचे चलन रियाल चलन चार टक्यांनी घसरले आहे, त्यामुळे अमेरिकेच्या १ डॉलरसाठी इराणला तब्बल 11,26,000 रियाल खर्च करावा लागणार आहे.

हेही वाचा - अॅसिडची तळी, मिठाचे डोंगर आणि भाजून टाकणारी उष्णता! जाणून घ्या, जगातील 'नरकाचे द्वार' कुठे आहे?


सम्बन्धित सामग्री