Iran Israel Conflict: धक्कादायक! ट्रम्प यांचा अल्टिमेटम फेल? इराणची खेळी पाहून अमेरिकेची चिंता वाढली

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर निर्बंध आणल्याने जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती वाढली आहे.

Iran Israel Conflict: धक्कादायक! ट्रम्प यांचा अल्टिमेटम फेल? इराणची खेळी पाहून अमेरिकेची चिंता वाढली

Iran Israel Conflict: इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला असून त्याचे पडसाद आता जागतिक पातळीवर उमटताना दिसत आहेत. या संघर्षात अमेरिकेचा वाढता सहभाग आणि इराणची आक्रमक भूमिका यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनली आहे. विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत निर्माण झालेला तणाव हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका ठरू शकतो.

होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक मानला जातो. या मार्गातून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची वाहतूक केली जाते. त्यामुळे या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम जागतिक तेलपुरवठ्यावर आणि किंमतींवर होऊ शकतो. सध्या इराणने या सामुद्रधुनीवर निर्बंध आणल्यामुळे अनेक देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा: PM Modi High Level Meeting: युद्धजन्य परिस्थितीत पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडमध्ये; पेट्रोलियम आणि ऊर्जा सुरक्षेसाठी घेतली उच्चस्तरीय बैठक

या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट इशारा दिला आहे. पुढील ४८ तासांत होर्मुझचा मार्ग खुला न केल्यास इराणच्या उर्जानिर्मिती केंद्रांवर हल्ला केला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांनी अमेरिकेच्या या भूमिकेला ठाम उत्तर दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना स्पष्ट केले की, इराण कोणत्याही धमक्यांना घाबरणार नाही. त्यांच्या मते, अशा प्रकारच्या धमक्या या इराणच्या ताकदीपुढे असहाय्यतेचे लक्षण आहे. देशाच्या सार्वभौमत्वावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

पेझेशकियान यांनी पुढे होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतही महत्त्वाचे विधान केले. त्यांनी सांगितले की, हा जलमार्ग सर्व देशांसाठी खुला आहे, मात्र ज्या राष्ट्रांनी इराणच्या हक्कांवर गदा आणली आहे, त्यांच्यासाठी या मार्गावर निर्बंध कायम राहतील. या वक्तव्यामुळे अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांमध्ये चिंता वाढली आहे.

हेही वाचा:Share Market News : आखाती युद्धाचा शेअर मार्केटवर असाही परिणाम! मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजारातून 88 हजार कोटी काढले गेले, विदेशी गुंतवणूक दारांची मोठी माघार

सध्याच्या परिस्थितीत मध्यपूर्वेत युद्धजन्य वातावरण निर्माण झाले असून त्याचे परिणाम केवळ संबंधित देशांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता, जागतिक व्यापारावर होणारा परिणाम आणि सुरक्षा परिस्थिती यामुळे अनेक देश सतर्क झाले आहेत.

आता पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. अमेरिका इराणविरोधात कोणती पुढील पावले उचलते आणि इराण त्याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देते, यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास याचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number