Sunday, July 13, 2025 09:43:51 AM

इराणने अधिकृतपणे इस्रायलविरोधात युद्ध केले जाहीर; खामेनी यांनी दिली एक्स पोस्टवर माहिती

इराणने इस्रायलविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी बुधवारी एका एक्स-पोस्टमध्ये युद्धाची घोषणा केली आहे.

इराणने अधिकृतपणे इस्रायलविरोधात युद्ध केले जाहीर खामेनी यांनी दिली एक्स पोस्टवर माहिती

नवी दिल्ली: इस्रायल आणि इराणमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत आहे. गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात इस्रायल इराणच्या अणु आणि तेल प्रकल्पांना सतत लक्ष्य करत आहे. प्रत्युत्तरात इराण देखील इस्रायलवर सतत क्षेपणास्त्रे डागत आहे. अखेर, इराणने इस्रायलविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी बुधवारी एका एक्स-पोस्टमध्ये युद्धाची घोषणा केली आहे. अयातुल्ला अली खामेनी यांनी त्यांच्या अधिकार इराणी लष्कराकडे सोपवले आहेत.

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबण्याचे नाव काही घेईना. अशातच, आता अमेरिकेनेही उघडपणे युद्धभूमीत उतरण्याची तयारी दाखवली आहे. अशाप्रकारे, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अधिकृतपणे युद्धाची घोषणा केली आहे. खामेनी आणि त्यांच्या कुटुंबाला ईशान्य तेहरानमधील एका भूमिगत बंकरमध्ये हलवल्यानंतर, खामेनी यांनी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सला महत्त्वाचे अधिकार सोपवले आहेत, अशी घोषणा करण्यात आली.

हेही वाचा: हिंदी भाषा सक्तीवर महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे काय म्हणाले?

खामेनींची एक्स-पोस्ट:

अयातुल्ला अली खामेनी यांनी सर्वप्रथम एक्स पोस्ट केले, ज्यात ते म्हणाले की, 'महान हैदरच्या नावाने, युद्ध सुरू झाले आहे'. नंतर थोड्याच वेळात खामेनींनी इस्रायलला इशारा देत म्हणाले की, 'आता दहशतवादी झिओनिस्ट राजवटीला कडक प्रत्युत्तर दिले पाहिजे. आम्ही त्यांच्याबाबतीत आता कोणतीही दया दाखवणार नाही'. या घोषणेनंतर इराणने इस्रायलवर 25 क्षेपणास्त्रे डागली.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले:

यापूर्वी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. तसेच, ट्रम्प म्हणाले की, 'इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी कुठे लपले आहेत हे आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला आत्ता त्यांना मारायचे नाही'. तसेच, इराण येथील नागरी वस्त्यांवर हल्ला करण्यास आम्ही इच्छुक नाही. मात्र, आता आमचा संयम संपत चालला आहे, ही गोष्टही खरी आहे. इराणला अणुकरार करण्याची गरज होती. मी त्यांना तसे करण्याची विनंती केली होती. पण इराण सहमत झाला नाही. मला आता बोलायचे नाही, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.


सम्बन्धित सामग्री