Mojtaba Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी पदभार स्विकारल्यानंतर गायब, जिवंत आहेत की नाहीत?चर्चांना उधाण

इराणचे नवे सर्वेसर्वा मोजतबा खामेनी यांनी 8 मार्च रोजी अधिकृतपणे सत्तेची सूत्रे हाती घेतली, परंतु तेव्हापासून ते एकदाही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत.

Mojtaba Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी पदभार स्विकारल्यानंतर गायब, जिवंत आहेत की नाहीत?चर्चांना उधाण

Mojtaba Khamenei: मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती अधिक चिघळत असतानाच इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाबाबत आता एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इराणचे नवे सर्वेसर्वा मोजतबा खामेनी यांनी 8 मार्च रोजी अधिकृतपणे सत्तेची सूत्रे हाती घेतली, परंतु तेव्हापासून ते एकदाही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. त्यांच्या या गूढ 'गायब' होण्यामुळे जागतिक स्तरावर विविध चर्चांना उधाण आले असून, त्यांच्या प्रकृतीबाबत किंवा अस्तित्वाबाबत गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.

अमेरिकेचे गंभीर दावे आणि अनुपस्थितीचे गूढ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी मोजतबा यांच्या अनुपस्थितीवर थेट बोट ठेवले आहे. मोजतबा यांचा मृत्यू झाला असावा किंवा ते एखाद्या भीषण अपघातात गंभीर जखमी असावेत, असा दावा अमेरिकेकडून वारंवार केला जात आहे. विशेष म्हणजे, 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या एका हल्ल्यात मोजतबा गंभीर जखमी झाल्याचे वृत्त 'द गार्डियन'ने सायप्रसमधील इराणी राजदूतांच्या हवाल्याने दिले होते. सत्तेवर आल्यानंतर 12 मार्च रोजी त्यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले खरे, मात्र ते स्वतः समोर आले नाहीत.एका निवेदकाने केवळ त्यांचा संदेश वाचून दाखवला.

सण-उत्सवांतूनही गायब; केवळ निवेदनांचाच आधार
इराणमधील महत्त्वाचे सण असलेल्या 'नवरोज' (20 मार्च) आणि 'ईद-उल-फित्र' (21 मार्च) च्या नमाजालाही मोजतबा उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या जागी केवळ छापील संदेश प्रसिद्ध करण्यात आले, जे अत्यंत असामान्य मानले जात आहे. दिवंगत अयातुल्ला अली खामेनी नियमितपणे टीव्हीवर येऊन जनतेशी संवाद साधत असत, परंतु मोजतबा यांच्या बाबतीत तसे घडताना दिसत नाही. यामुळे इराणचा खरा ताबा आता 'इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड' (IRGC) कडे गेला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

एआयचा वापर आणि विद्रूप चेहऱ्याची चर्चा
पाश्चात्य तज्ज्ञांच्या मते, मोजतबा यांच्या नावाने प्रसिद्ध होणारी चित्रे आणि व्हिडिओ 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) द्वारे तयार केल्याचा संशय आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी तर असा खळबळजनक दावा केला आहे की, इराणवरील हल्ल्यात मोजतबा यांचा चेहरा विद्रूप झाला असावा, म्हणूनच ते जगासमोर येणे टाळत आहेत. सत्तेचे केंद्र नेमके कोणाकडे आहे, याबाबत यामुळे संभ्रम वाढला आहे.

हेही वाचा – US Iran Conflict: इराण-अमेरिका युद्धाचा भडका! ट्रम्प यांचा तेहरानवर मोठ्या हल्ल्याचा दावा

इराणचा बचाव: केवळ सुरक्षेचे कारण?
दुसरीकडे, इराणने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या मते, मोजतबा पूर्णपणे सुरक्षित असून देशाचा कारभार प्रभावीपणे चालवत आहेत. केवळ सुरक्षेच्या कारणास्तव ते सध्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असल्याचे इराणच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूतांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मोजतबा खामेनी यांची ही 'गुप्त' कार्यपद्धती इराणमधील मोठ्या सत्तांतराची नांदी तर नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number