Iran Pakistan Talk: ‘आमचे शेजारी आहात, पण मध्यस्थ म्हणून तुमच्यावर विश्वास नाही’; इराणचा पाकिस्तानला मोठा झटका, भर सभेत काढले वाभाडे

इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेचा पहिला टप्पा पाकिस्तानमध्ये झाला होता, मात्र त्यातून कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नाही.

Iran Pakistan Talk:  ‘आमचे शेजारी आहात, पण मध्यस्थ म्हणून तुमच्यावर विश्वास नाही’; इराणचा पाकिस्तानला मोठा झटका, भर सभेत काढले वाभाडे

इराण आणि अमेरिकेमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मध्यस्थी करण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. इराणचे खासदार इब्राहिम रेजाई यांनी पाकिस्तानच्या निष्पक्षतेवर उघडपणे शंका व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, पाकिस्तान चांगला शेजारी असू शकतो, पण अमेरिकेसोबतचे त्याचे जुने संबंध पाहता तो विश्वासार्ह मध्यस्थ ठरू शकत नाही.

पाकिस्तानच्या भूमिकेवर थेट प्रश्न

रेजाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (एक्स) वर पोस्ट करत पाकिस्तानवर टीका केली. त्यांनी म्हटले की, “पाकिस्तान आमचा मित्र आणि शेजारी आहे, मात्र मध्यस्थ म्हणून त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवता येत नाही.” त्यांनी पुढे आरोप केला की इस्लामाबाद अनेकदा वॉशिंग्टनवर उघडपणे टीका करण्याचे टाळते आणि अमेरिकेने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याच्या मुद्द्यांवर मौन बाळगते.

निष्पक्षतेचा अभाव असल्याचा आरोप

रेजाई यांच्या मते, एक प्रभावी मध्यस्थ हा पूर्णपणे निष्पक्ष असायला हवा. मात्र पाकिस्तान एका बाजूकडे झुकलेला दिसतो, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी उदाहरण देत सांगितले की लेबनॉनमधील शस्त्रसंधीच्या मुद्द्यावर अमेरिका त्यांच्या  भूमिकेपासून मागे हटली, पण पाकिस्तानने यावर कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.

हेही वाचा: Iran Oman Relations: इराण-ओमानमध्ये मोठी खलबतं; 'होर्मुज'मध्ये इस्रायलला घेरण्याची तयारी?, समुद्री मार्गांच्या सुरक्षेसाठी मस्कतमध्ये हायव्होल्टेज बैठक

चर्चेचा दुसरा टप्पा रखडला

इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेचा पहिला टप्पा पाकिस्तानमध्ये झाला होता, मात्र त्यातून कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नाही. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याची चर्चा होण्याची शक्यता होती, पण इराणने सहभाग नाकारल्यामुळे ही प्रक्रिया सध्या ठप्प झाली आहे. दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी नुकताच पाकिस्तान दौरा पूर्ण केला आहे.

आर्थिक अडचणींमुळे पाकिस्तानवर टीका

या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानची आर्थिक परिस्थितीही चर्चेत आली आहे. चर्चेसाठी निवडलेल्या पाचतारांकित सेरेना हॉटेलचे बिलदेखील पाकिस्तान सरकारला भरता आले नाही, अशी माहिती समोर आली आहे. अखेरीस आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क यांना खर्च उचलावा लागला.

मध्यस्थी क्षमतेवर प्रश्नचिन्ह

या सर्व घडामोडींमुळे पाकिस्तान स्वतःला विश्वासार्ह मध्यस्थ म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असला, तरी त्याच्या कूटनीतिक क्षमतेवर आणि विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इराणच्या टीकेमुळे भविष्यातील वाटाघाटींमध्ये पाकिस्तानची भूमिका मर्यादित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा: Income Tax Department: 3 लाख कोटींच्या संशयास्पद व्यवहारांची कुंडली आयकर विभागाच्या हाती; काळा पैसा शोधण्यासाठी मोहीम तीव्र

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number