Sunday, March 08, 2026 11:29:12 PM

Asaduddin Owaisi: 'इराण बदला घेईल...'; खामेनीच्या मृत्यूमुळे ओवैसी संतापले; पंतप्रधान मोदींकडे केली 'ही' महत्त्वाची मागणी

&quotहा हल्ला अत्यंत निंदनीय, भ्याड आणि अमानवीय आहे, इराण याचा बदला नक्कीच घेईल,&quot असा इशारा ओवैसी यांनी दिला आहे.

asaduddin owaisi इराण बदला घेईल खामेनीच्या मृत्यूमुळे ओवैसी संतापले पंतप्रधान मोदींकडे केली ही महत्त्वाची मागणी

Asaduddin Owaisi: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या घटनेवर एमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. "हा हल्ला अत्यंत निंदनीय, भ्याड आणि अमानवीय आहे, इराण याचा बदला नक्कीच घेईल," असा इशारा ओवैसी यांनी दिला असून मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

"खामेनींना संपवणं हे अनैतिक आणि बेकायदेशीर कृत्य"
रविवारी माध्यमांशी संवाद साधताना ओवैसी म्हणाले की, अयातुल्ला खमेनी यांची हत्या करणे हे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असून ते एक अनैतिक कृत्य आहे. जिनेव्हामध्ये शांतता चर्चा सुरू असतानाच हा हल्ला करण्यात आला, ज्यात मुलींच्या शाळेसह अनेक नागरी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात सुमारे 200 इराणी नागरिक मारले गेल्याचा दावाही त्यांनी केला. या घटनेमुळे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता निर्माण होईल आणि त्याचा फटका तिथे काम करणाऱ्या 1 कोटी भारतीयांना बसू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेण्याचे आवाहन
ओवैसी यांनी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना या युद्धात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. "हे युद्ध शक्य तितक्या लवकर थांबले पाहिजे. भारताने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावून खामेनींच्या मृत्यूवर अधिकृत निवेदन जारी करावे," अशी मागणी त्यांनी केली. तसेच, इस्रायल आणि पाकिस्तान हे त्यांच्या शेजारील देशांमध्ये अशांतता पसरवणारे आक्रमक देश असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

तेहरानमध्ये खमेनींच्या कंपाऊंडवर भीषण हल्ला
इराणी राज्य माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 86 वर्षीय अयातुल्ला अली खामेनी यांचा मध्य तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानावर (कंपाऊंड) झालेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. उपग्रह प्रतिमांमधून या परिसराचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले आहे. खामेनी यांनी अनेक दशके इराणच्या सत्तेवर आणि लष्करी दलांवर (क्रांतिकारी गार्ड) आपले वर्चस्व राखले होते. त्यांच्या निधनामुळे इराणच्या भविष्याबद्दल मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.

हेही वाचा - Pakistan Attack American Embassy: पाकिस्तान रणमैदान बनलं; अमेरिकन दूतावासाची मोडतोड, पोलिसांचा आंदोलकांवर गोळीबार

अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
हा हल्ला इराणमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपाच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात मानली जात आहे. 'अमेरिका फर्स्ट' आणि 'कायमस्वरूपी युद्धे टाळण्याचे' आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी लष्करी शक्तीचे केलेले हे प्रदर्शन आगामी काळात मोठ्या हिंसक संघर्षाला निमंत्रण देऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


सम्बन्धित सामग्री