Mojtaba Khamenei Middle East Conflict: युद्धादरम्यान इराणची परिस्थिती अधिकचं चिंताजनक; इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी कोमात?

आखाती देशांमध्ये युद्ध पेटून 12 दिवस लोटले आहेत. इराण विरुद्ध अमेरिका इस्त्रायल यांच्यातील युद्ध इतके तीव्र होत चालले असून अशातच इराणमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Mojtaba Khamenei Middle East Conflict: युद्धादरम्यान इराणची परिस्थिती अधिकचं चिंताजनक; इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी कोमात?

आखाती देशांमध्ये युद्ध पेटून 12 दिवस लोटले आहेत. इराण विरुद्ध अमेरिका इस्त्रायल यांच्यातील युद्ध इतके तीव्र होत चालले आहे की या युद्धाची झळ आसपासच्या इतर देशांवर लागत आहे. अशातच इराणमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची प्रकृती अतिशय गंभीर असून ते सध्या कोमामध्ये आहेत.

हेही वाचा- Afghanistan Pakistan War: जग अशांततेच्या मार्गावर; इराण-इस्रायलनंतर अफगाणिस्तान-पाकिस्तान युद्ध पेटले, जोरदार एअरस्ट्राइक

इराणच्या नव्या सुप्रीम लीडरचा एक पाय कापण्यात आला तसेच त्यांच्या यकृत आणि पोटाला गंभीर जखमा झाल्या असून डोळ्यांजवळ दुखापत झाली आणि चेहऱ्यालाही लागलं आहे. यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. दरम्यान मोजतबा खामेनी यांना तेहरानमधील सिना युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये कडक सुरक्षेत आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. इराणचे आरोग्य मंत्री आणि नामवंत सर्जन मोहम्मद रजा जफरगंदी स्वतः त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. या बातमीची माहिती ब्रिटीश वृत्तपत्र 'द सन' ने दिली आहे. 

हेही वाचा- Iran Israel US Conflict: 'इराणमध्ये कोणीही सुरक्षित नाही'; इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याला इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याकडून इशारा
एकीकडे अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात दोन्ही देशांमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले सुरूच आहेत. आतापर्यंत इराणमध्ये किमान 1350 लोक मारले गेले आहेत आणि 17,000 हून अधिक जखमी झाले आहेत. दरम्यान, इस्रायलने लेबनॉनवर आपले हल्ले तीव्र केले आहेत, ज्यामध्ये आतापर्यंत 687 लोकांचा मृत्यू झाला आहे. असं असताना आता युद्धादरम्यान इराणची परिस्थिती अधिकचं चिंताजनक झाली आहे. 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून आयतुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर 8 मार्च रोजी मोजतबा खामेनी यांची इराणच्या सुप्रीम लीडर पदी नियुक्ती करण्यात आली. दरम्यान आता इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीमुळे मोठी खळबळ माजली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number